Mohol News : दुष्काळ जाहीर करून यापूर्वी शासनाने 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या आहेत त्या सवलती मोहोळ विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना द्या, दुष्काळामुळे व पाऊसच न पडल्याने बोअर व विहिरींची पाणी पातळी घटली आहे. कुणाच्या मोटारी फिरल्या ?
असा प्रश्न करत शेतकऱ्यांना शेती पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यापेक्षा वीज बिल च माफ करा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याची माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.
सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अनेक विविध प्रश्नांनी अधिवेशन गाजत आहे. चालू पावसाळ्यात मोहोळ तालुक्यात अपवाद वगळता संपूर्ण पावसाळा कोरडा गेला. परिणामी विहिरी व बोअर ची पाणी पातळी घटली.
खरिपात पेरणी केलेले उडीद, मूग, सोयाबीन, तूर ही पिके जळून गेली, तर रब्बी हंगामात अपेक्षित ज्वारी पेरणी झाली नाही. परिणामी ज्वारीचा दर आज 7 हजार रुपये क्विंटल झाला आहे. गरिबांची चटणी भाकरी ही महागली आहे.
दुष्काळाच्या यादीतून मोहोळ तालुका वगळला होता. मात्र आमदार यशवंत माने यांनी केलेले प्रयत्न, जनरेटा व तालुक्यातील वस्तुस्थितीचा अधिकाऱ्यांनी शासनाला दिलेला अहवाल यामुळे तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत झाला.
सध्या दुधाचा दर अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडेना. "पाण्यापेक्षा दूध स्वस्त" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. चारा टंचाई तर आहेच पण उपलब्ध चाराही महाग झाल्याने पशुपालक एक लाखाची गाय 50 ते 60 हजाराला विकू लागले आहेत. त्यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. येत्या उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळाले तरी समाधान असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.