माळशिरस विभागाच्या अकलूज उपविभागीय दंडाधिकारी शमा पवार यांनी बाजार बंदीचा आदेश पारित केला आहे.
लवंग (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून माळशिरस तालुक्यात (Malshiras Taluka) कोरोना (Covid-19) बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व आठवडे बाजार भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे. माळशिरस विभागाच्या अकलूज उपविभागीय दंडाधिकारी शमा पवार (Akluj Sub-Divisional Magistrate Shama Pawar) यांनी बाजार बंदीचा आदेश पारित केला आहे. तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, कोरोना प्रतिबंधक कर्मचारी, शासकीय अधिकारी आदींची अप्पर जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी अकलूज येथे कोरोना प्रतिबंधाबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी हा निर्णय घेऊन बाजार बंदचा आदेश काढला आहे. (Due to Corona all weekly markets in Malshiras taluka will be closed from tomorrow-ssd73)
माळशिरस तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा चढता आलेख दिसून येत असून, बुधवार (ता. 28) अखेर माळशिरस तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 27 हजार 441, मृत्यू 397 तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 26 हजार 216 इतकी आहे. सध्या विविध रुग्णालयांत 828 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता काही निर्बंध लावले जावेत, असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून येऊ लागला होता. आठवडे बाजारात गर्दी होत असल्याने सुरक्षित अंतर, मास्क न घालणे हे नियम पायदळी तुडवले जातात. या कारणास्तव पहिल्या टप्प्यात तालुक्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवून पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आठवडे बाजार बंद ठेवले जाणार आहेत. जे नियम पाळणार नाहीत त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
बंद करण्यात आलेले आठवडी बाजार
शुक्रवार : यशवंनगर, तांदूळवाडी, निमगाव, बोरगाव
शनिवार : धर्मपुरी, मांडवे, वेळापूर, मांडकी
रविवार : मोरोची, सदाशिवनगर, दहिगाव, खुडूस, उंबरे वेळापूर
सोमवार : माळीनगर, अकलूज, फळवणी, शिंदेवाडी
मंगळवार : पिलीव, इस्लामपूर
बुधवार : नातेपुते, तोंडले, महाळुंग, फोंडशिरस, जांबुड, संगम, मळोली.
गुरुवार : माळशिरस, वाघोली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.