डोळ्यांदेखत जळताहेत पिके, तरीही "नीरा'चे मिळेना आवर्तन ! अधिकारी नॉट रिचेबल

नीरा कालव्यातून पाणी मिळत नसल्याने पिक करपून जात आहेत
Crops
CropsCanva
Updated on

माळीनगर (सोलापूर) : उन्हाची वाढलेली तीव्रता, आटलेले पाण्याचे स्रोत, अशातच नीरा उजवा कालव्याचे दुसरे उन्हाळी आवर्तन मिळण्यास होत असलेला विलंब यामुळे माळीनगर भागातील ऊस, केळी, मका ही पिके जळू लागली आहेत. डोळ्यादेखत जळणारी पिके पाहून शेतकरी हताश झाले आहेत. दुसरे आवर्तन मिळण्यासाठी शेतकरी जलसंपदा विभागाच्या माळशिरसच्या अधिकाऱ्यांना अनेक दिवसांपासून मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे पाण्यासाठी शेतकरी टाहो फोडत असताना दुसरीकडे अधिकारी मात्र नॉट रिचेबल आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. (Due to non availability of water from Nira canal crops are being harvested)

माळीनगर भागात नीरा उजवा कालव्याचे पाणी माळीनगर बागाईतदार पाणीवाटप संस्थेतर्फे घनमापन पद्धतीने दिले जाते. घनमापन पद्धतीने पाणी वाटत करणारी ही महाराष्ट्रातील पहिली ब्रिटिशकालीन संस्था आहे. शेतकऱ्यांची पाणीपट्टी या संस्थेमार्फत जलसंपदा विभागास आगाऊ भरली जाते. यंदाच्या हंगामात माळीनगर भागात पहिले उन्हाळी आवर्तन 10 ते 28 मार्च दरम्यान मिळाले होते. त्यास आता दोन महिने होत आले आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांचे बोअर बंद पडले आहेत. चालू असलेले बोअर एक- दोन तासांवर येऊन गुळण्या मारत आहेत. परिणामी पाण्याअभावी ऊस करपू लागले आहेत. केळी, मका सुकून चालली आहे. घड असलेली केळी पिचकून आडवी होत आहे.

Crops
आमदारसाहेब, आता कोरोनाला पराभूत करूयात

नीरा उजवा कालव्याचे दुसरे आवर्तन मेच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, या भरवशावर शेतकरी बसले आहेत. मात्र, जलसंपदा विभागाच्या माळशिरसच्या अधिकाऱ्यांकडून अद्याप तरी त्याबाबत कसलीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. गेली दहा वर्षांपासून माळीनगर भागातील शेतकऱ्यांना आगाऊ पाणीपट्टी भरूनही उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन वेळेत मिळाले नाही. परिणामी उन्हाळ्यात पिके जळल्याने उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. दरवर्षी उन्हाळ्यातील दुसऱ्या आवर्तनास "ये रे माझ्या मागल्या' अशी येथील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांचा अनुभव पाहता, येथील शेतकऱ्यांनी 20 एप्रिल दरम्यानच हक्काचे दुसरे आवर्तन मिळावे, यासाठी पाणीवाटप संस्थेतर्फे जलसंपदा विभागास पत्र दिले आहे. आता मे महिना उजाडला तरी अजूनही दुसरे आवर्तन चालू झाले नाही. ते मिळण्यासाठी शेतकरी माळशिरस उपविभागाच्या उपअभियंत्यांना वारंवार दूरध्वनी करीत आहेत. कित्येकदा दूरध्वनी केला तरी त्या अधिकाऱ्यांचा मोबाईल कायम नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. उन्हाळी हंगामात तरी या अधिकाऱ्यांनी मोबाईल चालू ठेवावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Crops
मंगळवेढ्याच्या भूमिपुत्राला तब्बल 40 वर्षांनंतर संधी

अधिकाऱ्यांचा मोबाईल फ्लाइट मोडवर

माळीनगर भागातील दुसऱ्या आवर्तनाविषयी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माळशिरस उपविभागाचे उपअभियंता अमोल मस्कर यांना अनेकदा संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, व्हॉट्‌सऍपवर ते ऑनलाइन असल्याचे निदर्शनास येत होते. शेतकरी इकडे पाण्यासाठी आटापिटा करत असताना हे अधिकारी मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवून वाय-फाय नेट वापरून सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.