सावधान! सोलापूर जिल्हा बनतोय बिबट्यांचा अधिवास; जाणून घ्या कारणे

सावधान! सोलापूर जिल्हा बनतोय बिबट्यांचा अधिवास; जाणून घ्या कारणे
Leopard
LeopardCanva
Updated on
Summary

जिल्ह्यात कधीही न आढळणारा बिबट्या मागील वर्षभरात सहा वेळा आला आहे. गवा हा दोन वेळा आल्याच्या नोंदी आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) जैवविविधता कूस बदलत आहे. मूळचा रब्बीचा जिल्हा तसेच माळरान व तृणभक्षक प्राण्यांचा हा प्रदेश वाढत्या ऊस क्षेत्र व बागायतीकरणामुळे बिबट्याचा (Leopard) हंगामी रहिवास बनत आहे. जिल्ह्यात कधीही न आढळणारा बिबट्या मागील वर्षभरात सहा वेळा आला आहे. गवा हा दोन वेळा आल्याच्या नोंदी आहेत. या पार्श्‍वभूमीवर मानद वन्यजीव रक्षक निनाद शहा (Ninad Shaha) व भरत छेडा (Bharat Chheda) यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी, जिल्ह्यातील जैवविविधता बदलत असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्हा या दख्खनच्या पठारात मोडणारा, मध्य प्रदेश (Madhya Pradesh) ते तमिळनाडू (Tamilnadu) या विस्तीर्ण प्रदेशात तृणभक्षक प्राणी व विस्तीर्ण माळरान यामुळे विविध पक्ष्यांचा रहिवास मागील अनेक वर्षांपासून राहिला आहे. मात्र, उजनी धरणासह (Ujani Dam) अनेक प्रकल्प व विविध सिंचन सुविधांमुळे झालेले वाढते बागायतीकरण यामुळे माळराने झपाट्याने कमी झाली आहेत. कधीकाळी सोलापूरचे वैभव असलेला माळढोक पक्षी (Great Indian Bastard) दिसेनासा झाला आहे.

Leopard
श्रावण विशेष : सिद्धेश्‍वर मंदिर अन्‌ तलावाची सर्वदूर महती

याउलट सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने व ऊस हे बिबट्याला लपण्यासाठी दुसरे जंगलच असल्यामुळे मागील वर्षभरात किमान सहा ते सात वेळा बिबट्या दिसल्याच्या नोंदी आहेत. करमाळा, पंढरपूर तसेच भीमा नदीच्या परिसरात मागील काही वर्षांत ऊस शेती वाढल्याने या ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. वांगी नंबर 4 (ता. करमाळा ) येथे एका नरभक्षक बिबट्याने तीन व्यक्तींना ठार केल्याने अखेर त्या बिबट्याला ठार करावे लागले होते. मागील आठवड्यात मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्‍यात बिबट्याने दोन वासरे व एक शेळी ठार केली आहे. तसेच मागील महिन्यात अक्कलकोट तालुक्‍यात व पंधरा दिवसांपूर्वी बार्शी तालुक्‍यातील पानगाव रस्तापूर परिसरात गवा आढळला होता.

Leopard
कलवरी ऑर्केस्ट्रा बार प्रकरण : दोघांना पोलिस कोठडी; बार मालक फरार

जुन्नर, भीमाशंकर ते उजनी परिसरातील ऊस पट्टा, करमाळा व पंढरपूर तालुका तसेच नगर ते माढा, मोहोळ परिसरातील सीना नदी परिसर ही ठिकाणे आता बिबट्याच्या प्रवासाची झाली आहेत. मागील काही वर्षांत या परिसरात बिबट्याचे येणे-जाणे राहिले आहे. मात्र, तो कायमस्वरूपी या ठिकाणी राहात नाही.

- जयश्री पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (अतिरिक्त)

जिल्ह्यातील वाढत्या ऊस क्षेत्रामुळे बिबट्यांसाठी ऊस एक नवे जंगलच तयार होत आहे. यामुळे बिबट्यांचा वावर वाढणे स्वाभाविक आहे. पीक फेरपालट असणे हे शेती व पर्यावरणासाठीही आवश्‍यक आहे. मूळ रब्बीचा जिल्हा वाढत्या सिंचन प्रकल्पांमुळे उसाचा जिल्हा होत आहे.

- निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक

सोलापूर जिल्ह्याला 33 कोटी झाडांपेक्षा 33 टक्के गवताळ प्रदेशाची गरज आहे. आपल्याकडे माळरान आणि त्यावरील स्वतंत्र जैवपरिसंस्था मानायलाच तयार नाही. त्यामुळे बदल होणारच. लोकांनी आता बिबट्याबरोबरचे राहणे स्वीकारावे.

- भरत छेडा, मानद वन्यजीव रक्षक

या ठिकाणी आढळला बिबट्या

  • वांगी नंबर चार (ता. करमाळा): येथे बिबट्याकडून चार हल्ले; तीनजण ठार

  • वाळूज (ता. मोहोळ) : 26 जानेवारी रोजी एक बालक ठार

  • दोन महिन्यांपूर्वी भोयरे (ता. मोहोळ) येथे रेडकू ठार

  • गतवर्षी मार्च महिन्यात पंढरपूर तालुक्‍यात पेनूर परिसरात आढळला बिबट्या

येथे आढळला गवा

  • बार्शी तालुक्‍यात पानगाव- रस्तापूर परिसर

  • अक्कलकोट तालुक्‍यातील कलहिप्परगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.