"पहले कोरोना से निपट लेंगे, फिर ईद की खुशीयॉं मनायेंगे !'

मुस्लिम समाजात धार्मिक दृष्ट्या रमजान महिना व ईदचे अनन्य साधारण महत्व आहे.
"पहले कोरोना से निपट लेंगे, फिर ईद की खुशीयॉं मनायेंगे !'
Updated on
Summary

सलग दुसऱ्या वर्षी रमजान ईदवर कोरोनाचे सावट आहे. मुस्लिम समाजात धार्मिक दृष्ट्या रमजान महिना व ईदचे अनन्य साधारण महत्व आहे.

बेगमपूर (सोलापूर) : पहले कोरोना (Corona) से निपट लेंगे, फिर ईद (Eid) की खुशीया मनायेंगे. असा निर्धार करीतच मुस्लिम बांधवाकडून यंदा रमजान ईद (Ramajan eid) अत्यंत साध्या पद्धतीने साजरी होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सलग दुसऱ्या वर्षी रमजान ईदवर (Ramajan eid) कोरोनाचे सावट आहे. मुस्लिम समाजात धार्मिक दृष्ट्या रमजान महिना व ईदचे अनन्य साधारण महत्व आहे. (Due to the rising corona ramajan eid will be celebrated in a very simple manner)

संपूर्ण महिनाभर रोजा (उपवास), तरावीह, नमाज, कुराण पठण करीत ईश्वराची इबादत (सेवा) केली जाते. ईदच्या माध्यमातून या महिन्याची सांगता होते. त्यामुळे रमजान ईद म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते. परंतु मागील वर्षभरापासून कोरोनामुळे संपूर्ण जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीने मानवी जीवनच विस्कळीत केले आहे. सर्वधर्मीय सण, उत्सव यावर मोठा परिणाम झाला आहे. मागील वर्षापेक्षाही यंदाची परिस्थिती अतिशय विदारक आहे.

कोरोनामुळे अनेक कुटूंबियांसह मित्र परिवारावर ओढावलेले दुःखद प्रसंग, वाढत्या महागाईबरोबरच निर्माण झालेला बेरोजगारीचा प्रश्न व कोरोनाची सद्यस्थिती या बाबींचा विचार करता चार दिवसांवर ईद आलेली असून समाज बांधवांत कसलाही उत्साह दिसून येत नाही. त्यामुळे बाजारपेठेत ना नव्या वस्तुची खरेदी, ना नव्या कपड्यांची खरेदी, ना किराणा बाजाराची लगबग सर्व काही शांत, असेच वातावरण विशेषतः ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.

"पहले कोरोना से निपट लेंगे, फिर ईद की खुशीयॉं मनायेंगे !'
लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

ईद तो हर साल आनेवाली है, पर जिंदा रहेंगे तो ही ईद मनायेंगे ना, इसलिये पहले कोरोना से निपट लेंगे और फिर ईद की खुशीया मनायेंगे, असा आशावाद ठेवूनच अत्यंत साध्या पद्धतीने ईद साजरी करणार असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

दरम्यान समाजातील काही दानशूर व सामाजिक भान ठेवणाऱ्याकडून सर्वच जाती धर्मातील वृद्ध, गरिब, निराधार, बेरोजगार कुटूंबियांना अन्नधान्यासह, रोख रकमेची शक्य तेवढी मदत दिली जात असून सध्या अनेकांपुढे रोजी रोटीचा प्रश्न गंभीर आहे, अशा गरजूंना आणखी मदत करण्यासाठी दानशूर व्यक्तीनी हातभार लावण्याबरोबरच कोरोंनाग्रस्त व्यक्ती व कुटूंबियांना मानसिक आधार देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया हाजी एम. इब्राहिम बागवान (पंढरपूर), प्रा. सुबानअली शेख (राष्ट्रवादी, प्रदेश सचिव, हिंगोली), हाजी बशीर अहमद शेख, प्रा.इरफान सर (सोलापूर), आदी समाज बांधवांनी व्यक्त केल्या. दरम्यान चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी होणारी ईदची नमाज प्रत्येकांनी घरीच अदा करावी, असे आवाहन ही गावोगावच्या समाज प्रमुखांनी केली आहे.

(Due to the rising corona ramajan eid will be celebrated in a very simple manner)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.