भक्तांनो, मंदिराकडे याल तर कारवाईला तुम्हीच जबाबदार !

भक्तांनो, मंदिराकडे याल तर कारवाईला तुम्हीच जबाबदार !
भक्तांनो, मंदिराकडे याल तर कारवाईला तुम्हीच जबाबदार !
भक्तांनो, मंदिराकडे याल तर कारवाईला तुम्हीच जबाबदार !Canva
Updated on

आषाढच्या उत्तरार्धात म्हणजे पौर्णिमा संपल्यानंतर ते अमावास्येपर्यंत पूर्व भागात पोशम्मा सण साजरा केला जातो.

सोलापूर : आषाढच्या उत्तरार्धात म्हणजे पौर्णिमा संपल्यानंतर ते अमावास्येपर्यंत पूर्व भागात पोशम्मा सण (Poshamma Festival) साजरा केला जातो. पावसाळ्यात होणाऱ्या रोगराईंपासून बचाव करण्यासाठी भक्तगण देवीला नैवेद्य दाखवून साकडे घालण्याची परंपरा आहे. मरिआई, पोशम्मा, महालक्ष्मी, म्हैसम्मा, यल्लम्मा अशा विविध देवी मंदिरांमध्ये आषाढच्या उत्तरार्धात भाविकांचा मोठा ओघ असतो, पण गतवर्षी कोरोना (Covid-19) आपत्तीमुळे मंदिरे बंद होती. श्रद्धेपोटी भाविकांची मंदिराबाहेरून दर्शन घेण्यासाठी वा नैवेद्य दाखविण्यासाठी गर्दी होण्याच्या शक्‍यतेने पोलिसांकडून मंदिर व्यवस्थापनाला मंदिर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आषाढ महिन्यात पोशम्मा सण भाविकांनी घराचत साजरा करावा. नैवेद्य दाखविण्यासाठी मंदिराकडे येऊ नये. अन्यथा, पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईला तुम्हीच जबाबदार राहाल, असा इशारा पूर्व भागातील देवी मंदिरांकडून देण्यात आला आहे. (During the month of Ashadh, all the temples of Goddess in the city will be closed due to Corona-ssd73)

भक्तांनो, मंदिराकडे याल तर कारवाईला तुम्हीच जबाबदार !
महापालिका आयुक्त म्हणाले, "परिवहन'चे खासगीकरणच उचित ठरेल !

हे लक्षात घेऊन पूर्व भागातील काही देवी मंदिरे पत्राशेड, कापडी आच्छादनाने झाकून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यंदादेखील कोरोना आपत्ती कायम असल्याने ही मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. विडी घरकुलमधील पोशम्मा मंदिर, अशोक चौकातील म्हैसम्मा मंदिर हे पूर्णत: बंद आहेत. म्हैसम्मा मंदिराजवळ भाविकांसाठी सूचनाफलक लावण्यात आले आहे.

भक्तांनो, मंदिराकडे याल तर कारवाईला तुम्हीच जबाबदार !
आमदार प्रणिती शिंदेंच्या वक्‍तव्याने महेश कोठेंची वाढली चिंता!

भाविकांनी कोरोना आपत्तीमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही घरातच पोशम्मा सण साजरा करावा, दर्शन वा नैवेद्य दाखविण्यासाठी मंदिराकडे येऊ नये. या नियमाचे पालन न केल्यास जर पोलिसांनी कारवाई केल्यास त्याला तुम्हीच जबाबदार राहाल, असा इशारादेखील या मंदिरातर्फे देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी काही भाविकांनी नियम धुडकावून काही मंदिरांच्या ठिकाणी बाहेरच नैवेद्य दाखविण्यासाठी गर्दी केली होती. हे लक्षात घेता आता पोलिसांना प्रत्येक मंदिराजवळ बंदोबस्त ठेवण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()