पीएम किसान निधी योजनेसाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन; शमा पवार

ई-केवायसी ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे करण्यासाठी पोर्टलवर पर्याय उपलब्ध करुन दिला आहे
e-KYC for PM Kisan Nidhi Yojana Shama Pawar solapur
e-KYC for PM Kisan Nidhi Yojana Shama Pawar solapuresakal
Updated on

सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन निवास उपजिल्हाधिकारी तथा योजनेच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी शमा पवार यांनी केले आहे.ई-केवायसी ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीद्वारे करण्यासाठी पोर्टलवर पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

त्यामध्ये संबंधित लाभार्थी शेतकरी यांनी पी. एम. किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वत: ई-केवायसी प्रमाणिकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर ई-केवायसी प्रमाणिकरण बायोमेट्रीक पध्दतीने करता यईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर (सीएससी) बायोमॅट्रीक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी प्रति बायोमॅट्रीक प्रमाणिकरण दर १५ रूपये निश्‍चित करण्यात आला आहे. पी. एम किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना एप्रिल- जुलै २०२२ या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.