सोलापूर : सरकारने आयात शुल्कात वाढ केल्याने सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलाच्या महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडणार आहे.तीन दिवसापूर्वी केंद्र सरकारने अचानक खाद्य तेलावरील आयात शुल्कात वाढ केली. कच्चे तेल व रिफाईन्ड असे दोन प्रकारचे खाद्यतेल आयात केले जाते.कच्च्या तेलावर पूर्वीचे आयात शुल्क हे ५ टक्क्यांवरून २५ टक्के एवढे वाढवले गेले आहे. रिफाईंड खाद्य तेलावर देखील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढले. त्यासोबत खाद्य तेलात सरसकट २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.