Election Commission : यादीसाठी ‘बीएलओ’ २४ जुलैपर्यंत मतदारांच्या दारी;विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम

भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्र मतदार विशेष संक्षिप्‍त पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
Election Commission
Election Commissionsakal
Updated on

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्र मतदार विशेष संक्षिप्‍त पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ३ हजार ५९९ बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) २४ जुलैपर्यंत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्या अनुषंगाने मतदान नोंदणी नियम १९६० मध्ये देखील सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार चार अर्हता तारीख (१ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर) निश्‍चित केल्या आहेत. या अर्हता तारखेला १८ वर्षे पूर्ण करणारे व त्यावरील सर्व नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी.

जिल्ह्यातील नागरिकांनी आपली नावे, फोटो, पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्यावीत. ज्यांची दुरुस्ती असतील त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी व ज्यां नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन, बीएलओ व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांची नावे वगळली असल्याच्या तक्रारी होत्या. या शिवाय जिवंत असताना मयत मतदारांच्या यादीत नावे गेली असल्याच्याही तक्रारी होत्या. या तक्रारींचा निपटारा या निमित्ताने होणार आहे.

मतदारांच्या मदतीसाठी

१८ वर्षे पूर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरिकांना www.voters.ecl.gov.in व voter helpline App (VHA) च्या माध्यमाने नोंदणी करता येणार आहे. मतदार यादीमध्ये आपले नांव आहे की कसे हे शोधण्यासाठी www.electorasearch.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा दूरध्वनी क्रमांक १९५० यावर संपर्क साधावा.

असा असेल कार्यक्रम

  • एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : २५ जुलै

  • दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : २५ जुलै ते ९ ऑगस्ट

  • दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत : १९ ऑगस्ट

  • अंतिम मतदार यादी प्रसिध्दी : २० ऑगस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.