विधानसभेपूर्वी सोलापूर बाजार समितीची निवडणूक! आज अंतिम होणार मतदार यादी; ‘डीडीआर’कडून जाणार सहकार प्राधिकरणाला प्रोग्राम

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदार यादी उद्या (बुधवारी) अंतिम होईल. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सहकार निवडणूक प्राधिकरणाला बाजार समितीच्या निवडणुकीचा अंदाजित प्रोग्राम पाठविला जाणार आहे.
solapur
solapurelection
Updated on

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदार यादी उद्या (बुधवारी) अंतिम होईल. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सहकार निवडणूक प्राधिकरणाला बाजार समितीच्या निवडणुकीचा अंदाजित प्रोग्राम पाठविला जाणार आहे.

महाराष्ट्रातील नामांकित व सर्वाधिक उलाढालीत सोलापूर बाजार समिती पहिल्या पाचमध्ये आहे. कांदा, डाळिंब, द्राक्ष व अन्य भाजीपाला, फळांची मोठी आवक बाजार समितीत नेहमीच असते. बाजार समितीच्या संचालकांची मुदत व दिलेली मुदतवाढ संपल्यानंतर सध्या बाजार समितीवर प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नेमणूक झाली आहे. त्यानंतर दोन अशासकीय सदस्यांच्या निवडीचे पत्र शासनाकडून ‘पणन’ला पाठविण्यात आले आहे. पण, तिकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला काहीही पत्रव्यवहार झाला नसल्याने त्या दोन्ही अशासकीय सदस्यांच्या निवडी अद्याप झालेल्या नाहीत.

सध्या सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर येथील विकास कार्यकारी सोसायट्यांमधील मतदार, दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या दोन तालुक्यातील ग्रामपंचायतींचे मतदार व बाजार समितीतील व्यापारी, हमाल-तोलार या मतदारांचा समावेश असणार आहे. साधारणत: विकास सोसायट्यांमधील एक हजार ८९५, ग्रामपंचायतींमधील एक हजार १७६, व्यापाऱ्यांमधील एक हजार २७६ आणि हमाल-तोलारमधील एक हजार ८४ असे एकूण पाच हजार ४३१ मतदार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी असू शकतात. पण, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अंतिम मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘असे’ असतील बाजार समितीचे संचालक

  • विकास सोसायट्यांमधून : ११

  • ग्रामपंचायत मतदारांमधून :

  • व्यापाऱ्याांमधून :

  • हमाल-तोलारमधून :

  • एकूण संचालक : १८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.