जून महिन्यात शहरातील नऊ हजार थकबाकीदारांचे वीज कनेक्‍शन कट !

जून महिन्यात तोडले शहरातील नऊ हजार थकबाकीदारांचे वीज कनेक्‍शन !
Connection Cut
Connection CutCanva
Updated on

एका महिन्यात जवळपास 9 हजार 92 ग्राहकांची वीज खंडित करून त्यांच्याकडून 10 कोटी 80 लाख रुपये वसूल करण्यात आले.

सोलापूर : वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध महावितरण (MSEDCL) प्रशासनाने कारवाई तीव्र केली आहे. या अंतर्गत सोलापूर शहरातील जवळपास 9 हजार ग्राहकांची वीज कनेक्‍शन तोडण्यात आले असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली. जून महिन्याच्या सुरवातीला शहरात जवळपास 1 लाख 12 हजार 617 ग्राहकांकडे 53 कोटी 44 लाख थकबाकी होती. त्यामुळे महाविरतण प्रशासनाने शहरात थकीत वसुली मोहीम तीव्र केली. त्यामुळे एका महिन्यात जवळपास 9 हजार 92 ग्राहकांची वीज खंडित करून त्यांच्याकडून 10 कोटी 80 लाख रुपये वसूल करण्यात आले. मात्र आता 91 हजार 437 ग्राहकांकडे 44 कोटी 49 लाख रुपये अद्यापही थकबाकी असल्याचे प्रशासनाने सांगितले. तर 1 हजार 482 ग्राहकांची वीज पुन्हा जोडण्यात आली आहे. (Electricity connections of nine thousand arrears in the Solapur city were broken in June)

Connection Cut
अमेरिकेतील शीतल सोनार उलगडणार अक्षरकलेतून पंढरीची वारी !

ग्राहकांनी महावितरणच्या आवाहनानुसार थकबाकी भरली आहे; परंतु ज्या ग्राहकांनी पैसे भरले नाही त्यांचे वीज कनेक्‍शन कापले जात आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वीज बिल थकबाकीदार ग्राहकांनी आपणाकडे असलेली थकबाकी भरून महाविरण प्रशासनास सहाकार्य करावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

Connection Cut
"राष्ट्रवादी'ची सावध पावले ! नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी

ग्राहकांकडून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाणीचे प्रकार

वीज बिलाच्या थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाचे कर्मचारी थकबाकी वसूल करण्यासाठी विविध भागात जात आहेत. मात्र त्या कर्मचाऱ्यांना थकबाकीदारांकडून वीज पुरवठा खंडित करीत असताना शिवीगाळ आणि मारहाणीचे प्रकार घडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांनी आपली थकबाकी भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.