सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार वाहनचालकांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर्मन भाषा शिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा खर्च राज्य शासन उचलणार असून सोलापूर प्रादेशिक कार्यालयाकडून याबाबत नियोजन केले जात आहे. .विदेशात नोकरी करण्याची संधी विविध क्षेत्रातील उच्चशिक्षितापर्यंतच मर्यादित होती. परंतु आता राज्य शासनाने जर्मन देशासोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे जिल्ह्यातील बस, रेल्वे, ट्रक, हलकी व जड वाहने चालविणाऱ्यांनाही संधी मिळणार आहे. .राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी जर्मनीतील बाडेन - वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातील विविक्ष क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बाडेन वुटेनबर्ग या राज्यासोबत महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये सामंजस्य करार केला. त्याची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून होणार आहे. परंतु त्यासाठी संबंधित व्यक्तीला जर्मन भाषा येणे ही पहिली अट असणार आहे.जिल्ह्यात दहा केंद्र उभारणारप्रादेशिक परिवहनसह वैद्यकीय, कौशल्य विकास, तंत्रशिक्षण, कामगार विभागांतर्गत येणाऱ्या कुशल कामगारांना जर्मनीत जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक, प्रयोगशाळा, .Solapur Bhima Sugar Factory : भीमा करणार पाच लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप; अध्यक्ष महाडिक.सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक, दंतचिकित्सा सहाय्यक, केअर टेकर, सेवक, वेटर, हॉटेल व्यवस्थापक, गोदाम व्यवस्थापक, विक्री सहाय्यक, विजतंत्री, गवंडीकाम आदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जर्मनीत रोजगाराची संधी मिळणार आहे. जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात सध्या पाच केंद्र असून आणखी पाच केंद्र उभारण्यात येणार असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी सांगितले.अशी असेल प्रक्रियाऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्जाची राज्यस्तरावरून छाननी होऊन संबंधित जिल्ह्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रामधून त्यांना प्रशिक्षण मिळणार. जर्मन भाषा प्रशिक्षणाच्या दोन लेवल आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर राज्यस्तरावर परीक्षा होईल. त्यानंतर जर्मनीत जाण्याची संधी मिळेल..Solapur: मोहोळ पोलिसांनी मोठी कारवाई, पाच गुन्हे उघड करून सोन्याचे दागीने केले हस्तगत !.जिल्हास्तरावर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जर्मनीमधील अनेक देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत. परंतु तेथे कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. राज्यातील युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील साधारण दोन हजार वाहनचालकांना प्रशिक्षणासाठीची प्रक्रिया प्रादेशिक कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.— गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.