Madha Lok Sabha Election: राजकारणातील शत्रू बनले मित्र अन्‌ मित्र झाले शत्रू, राजकीय उलथापालथीमुळे तालुक्यातील पक्षीय समीकरणांमध्ये बदल

Madha Lok Sabha Election: माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माढा विधानसभा मतदारसंघातील व माढा तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघत आहे.
Madha Lok Sabha Election
Madha Lok Sabha ElectionEsakal
Updated on

माढा : माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माढा तालुक्यातील व विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. कालपर्यंत एकमेकांचे राजकीय मित्र असलेले आता एकमेकांचे शत्रू बनले असून, राजकीय शत्रू असलेले एकमेकांचे मित्र झाले, अशी काहीशी स्थिती माढ्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे. माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माढा विधानसभा मतदारसंघातील व माढा तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघत आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत गेले. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी अजित पवार गटामध्ये जाणे पसंत केले. यामुळे आमदार बबनराव शिंदे हे महायुतीचा भाग बनले. या राजकीय घडामोडींच्या अगोदर शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींमुळे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत व प्रा. शिवाजीराव सावंत यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये जाणे पसंत केले.

Madha Lok Sabha Election
Sangli Lok Sabha Election 2024 : करायला गेले एक अन्...; संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यात नेमकं काय घडलं?

आमदार शिंदे व प्रा. सावंत बंधू यांची माढा तालुक्यात व विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी राजकीय बैठक होती. या दोघांमधले राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. मात्र, आता हे दोघेही महायुतीचा भाग बनलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार शिंदे व प्रा. सावंत बंधूंना महायुतीच्या रणजितसिंह नाईक- निंबाळकरांचा प्रचार करणे क्रमप्राप्त आहे.

सध्या तरी आमदार शिंदे व प्रा. सावंत बंधू हे प्रचारासाठी एकाच मंचावर आलेली दिसत नाहीत, त्यामुळे या दोघांमध्ये असलेले राजकीय शत्रुत्व संपून महायुतीचा भाग म्हणून मैत्रीचा अध्याय सुरू होणार, की मैत्रिपूर्ण राजकारणाचा कार्यक्रम चालू राहणार? हे या लोकसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडीत दिसून येणार आहे. मात्र, सध्या तरी एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले आमदार शिंदे व प्रा. सावंत हे महायुतीच्या रणजितसिंह नाईक- निंबाळकरांच्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

Madha Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभेच्या मैदानात ठाकरेंनी उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती? स्मिता वाघ यांना देणार मोठी टक्कर?

जुनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आघाडीच्या काळात माजी आमदार धनाजीराव साठे व विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये आघाडीचा धर्म म्हणून एकमेकांना कमी- अधिक प्रमाणात का होईना पण सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे माजी आमदार साठे व आमदार शिंदे यांच्यातील ही राजकीय मैत्री अथवा तडजोडीची भूमिका एकमेकांना पूरक अशी घेण्याचा राजकीय इतिहास मागील अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेला आहे.

मात्र, आता आमदार शिंदे हे महायुतीचा भाग झाले तर काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार धनाजीराव साठे हे महाविकास आघाडीचा घटक बनलेले आहेत. आमदार शिंदे व माजी आमदार साठे यांच्यात मागील अनेक वर्षांपासून असलेली राजकीय मैत्री आता राजकीय शत्रुत्वात बदलताना दिसते.

Madha Lok Sabha Election
Pravin Mane join Ajit Pawar group: निवडणुकीपुर्वी सुप्रिया सुळेंना धक्का! प्रवीण मानेंनी सोडली साथ, स्वत:च केलं स्पष्ट

दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या शिंदे गटाचे माढा लोकसभा प्रमुख संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे हे महायुतीचे घटक बनल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला आहे. राजकारणात आमदार शिंदे यांचे विरोधक म्हणून संजय कोकाटे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. यासाठी त्यांनी सत्ताधारी गटाचा त्याग करत विरोधी बाकावर बसणे पसंत केले आहे.

निंबाळकरांच्या विरोधात पूर्वीचे मित्र मोहिते-पाटील

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र राहात नसतो, या वाक्याची प्रचिती महायुती व महाआघाडीतील राजकीय उलथापालथीमुळे माढा तालुक्यातील राजकीय पटलावर येताना दिसते. म्हणूनच मागील लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व आमदार संजय शिंदे हे आता हातात हात घालून प्रचार करताना दिसत आहेत. तर मागील लोकसभा निवडणुकीत खासदार नाईक- निंबाळकर यांना मोठे मताधिक्य देणारे मोहिते- पाटील हे आता निंबाळकरांच्या विरोधात उभे ठाकण्याच्या प्रयत्नात आहेत.

Madha Lok Sabha Election
Supriya Sule: सुप्रिया सुळेंना बारामतीत धक्का! प्रवीण माने सुनेत्रा पवारांना देणार पाठिंबा? आज स्पष्ट करणार भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()