Solapur News : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माजी आमदार राजन पाटील यांच्या भेटीमुळे चर्चेला उधान

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची अनगर ता मोहोळ येथे वाड्यावर भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. बंद दाराआड काय चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकला नाही.
ex dcm vijaysinh mohite patil and ex mla rajan patil meeting
ex dcm vijaysinh mohite patil and ex mla rajan patil meetingSakal
Updated on

मोहोळ : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची अनगर ता मोहोळ येथे वाड्यावर भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. बंद दाराआड काय चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकला नाही.

दरम्यान ती आमची कौटुंबिक भेट होती असा निर्वाळा माजी आमदार पाटील यांनी दिला. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन नेत्यांच्या भेटीमुळे अनेक वेगवेगळे आखाडे कार्यकर्ते बांधू लागले आहेत.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे त्यांच्या खाजगी कामासाठी गेले होते. जाताना ते अनगर मार्गे गेले. मात्र कार्यकर्त्याच्या गावावरून जाताना त्या ठिकाणी तो आहे की नाही याची चौकशी करून त्याची भेट घेण्याची परंपरा गेल्या पन्नास वर्षापासून मोहिते पाटील घराणे जपत आहे असे माजी आमदार पाटील यांनी सांगितले.

त्याच पार्श्वभूमीवर माझी व मोहिते पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांनी मी जाताना जेवणाचे आमंत्रण दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर ते आले असल्याने माजी आमदार पाटील यांनी सांगितले. आमची भेट ही राजकारणा पलीकडची होती त्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले. माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांची भेट जरी कौटुंबिक असली तरी ऐन लोकसभा निवडणुकीच्या धांदलीत ही भेट झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()