Solapur News : संकल्पनाचे स्पष्टीकरण, सरावाने आदित्यला शंभर टक्के यश

पीसीएम ग्रुपमधून अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेणार असल्याचे मत आदित्य अमित कामतकरने व्यक्त केले
Solapur News : संकल्पनाचे स्पष्टीकरण, सरावाने आदित्यला शंभर टक्के यश
Solapur NewsEsakal
Updated on

सोलापूर ः संकल्पना समजावून घेत अभ्यास करत असताना सराव परीक्षांमधूनच मला १०० टक्के गुणांचा आत्मविश्वास मिळाला. नियमित अभ्यासोबत आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलो. आता पीसीएम ग्रुपमधून अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेणार असल्याचे मत आदित्य अमित कामतकरने व्यक्त केले.

Solapur News : संकल्पनाचे स्पष्टीकरण, सरावाने आदित्यला शंभर टक्के यश
Crime News : मोबाईल रिचार्ज करायला गेले ते परत आलेच नाही; वडिलांचा सापडला रक्ताळलेला मृतदेह

शहरात दहावी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारा आदित्य कामतकर हा एकमेव विद्यार्थी ठरला. जिल्हयात १०० टक्के गुण मिळवणारे फक्त दोनच विद्यार्थी आहेत. सकाळशी बोलताना त्या त्याचा यशाचा प्रवास मांडला. इंडियन मॉडेल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या आदित्यने दहावीची तयारी अगदी पहिल्या दिवसापासून सुरु केली होती. त्याने प्रत्येक विषयातील अभ्यास घटकाच्या मुळ संकल्पना स्पष्टपणे समजून घेतल्या. ज्या संकल्पना समजत नव्हत्या त्या लगेच शिक्षकांकडून तेव्हाच स्पष्ट करुन घेतल्या. त्यामुळे विषयातील अध्ययनाचे काम सुरवातीपासून झाले.

Solapur News : संकल्पनाचे स्पष्टीकरण, सरावाने आदित्यला शंभर टक्के यश
Nagpur News : नागपूरकर ‘निर्मिती’च्या दिग्दर्शनाला लघुपट पुरस्काराचे कोंदण

आदित्यने सुरवातीपासून तीन तास रोज अभ्यास केला. त्यानंतर परीक्षेच्या काळात अभ्यासाचे तास वाढवले. दिवाळीनंतर त्याने सराव परीक्षातून उत्तरपत्रिका वेळेत लिहिण्याचा सराव केला. भाषा विषयात निबंध व पत्र लेखनात विचार करण्यास वेळ अधिक जातो हा वेळ त्याने सरावातून नियंत्रित करण्याचे कौशल्य साधले. इतिहासाचा विषय कंटाळवाणा असतो असे न समजता त्याने या विषयात रुची निर्माण करत वेगळ्या दृष्टीकोनातून सामाजिक शास्त्रे समजून घेतली. त्याने कामतकर कोचिंग क्लासेसचे संचालक सुनील कामतकर यांनी टेस्ट सिरिजचा सराव करुन घेतला.

Solapur News : संकल्पनाचे स्पष्टीकरण, सरावाने आदित्यला शंभर टक्के यश
Motivation News : ‘निराशा’च्या जीवनात उजळला आशेचा किरण

१०० टक्के गुणांचा पॅटर्न

- प्रत्येक विषयाच्या धड्यातील घटकाची संकल्पना स्पष्ट करुन घेतली

- पहिल्यादिवसापासून २ ते ४ तास अभ्यास

- संकल्पना स्पष्ट झाल्याने अभ्यासाला वेग

- अभ्यासातील अडचणी वेळेत सोडवल्या

- तीन सराव परीक्षातून यशाचा अंदाज

- भाषा विषयात देखील प्रश्न सोडवण्यासाठी वेळेचा अचूक उपयोग

तबल्यात उस्ताद

आदित्यने दहावीची परीक्षा असली तरी तो नियमित तबला शिकतो. त्याचा सराव देखील त्याने सुरु ठेवला. अगदी डिसेंबरमध्ये तबल्याच्या शिक्षणाची एक परीक्षा देखील दिली. त्यातही त्याने यश मिळवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com