शहर कॉंग्रेसमध्ये गटबाजी! युवकाध्यक्षांनी मागितला शहराध्यक्ष, कार्याध्यक्षांचा राजीनामा

आगामी महापालिकेत महापौर आमचाच, अशी वलग्ना करून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शहर कॉंग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागल्याची स्थिती आहे. शहर युवकाध्यक्ष अंबादास करगुळे यांनी थेट शहराध्यक्ष प्रकाश वाले व कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांचा राजीनामा मागितला आहे.
congress
congressesakal
Updated on

सोलापूर : आगामी महापालिकेत महापौर आमचाच, अशी वलग्ना करून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शहर कॉंग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागल्याची स्थिती आहे. शहर युवकाध्यक्ष अंबादास करगुळे यांनी थेट शहराध्यक्ष प्रकाश वाले व कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांचा राजीनामा मागितला आहे. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावरून करगुळे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

congress
रिक्षातून 28 तोळे सोने चोरीला! मावस बहिणीच्या साखरपुड्याला गेल्यावर 28 तोळ्याची घरफोडी

महापालिकेची प्रभागरचना आता अंतिम टप्प्यावर असून राज्य निवडणूक आयोगाकडून दोन- चार दिवसात त्यावर निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार होऊन आरक्षण जाहीर होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, कॉंग्रेसकडून जवळपास तीनशे ते साडेतीनशे उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचा दावा शहराध्यक्ष वाले यांनी केला असून, त्यांनी महाविकास आघाडीवेळी सन्मान न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचाही इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत युवक शहराध्यक्ष करगुळे यांनी शहराध्यक्ष वाले व कार्याध्यक्ष हेमगड्डी यांना शहरातील प्रभाग व सर्व प्रभागातील परिसरदेखील माहिती नसल्याचा आरोप केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करून शिवसेनेला मदत करणाऱ्या नगरसेविकेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद वाले व हेमगड्डी यांनी स्वीकारल्याबद्दल करगुळे यांनी निवडणुकीपूर्वी दोन्ही पदाधिकारी बदलावेत, अशी मागणीही सोशल मीडियातून माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली आहे. पक्षवाढीसाठी प्रयत्न करणारे ताकदवान पदाधिकारी द्यावेत, असेही करगुळे यावेळी म्हणाले. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले. महापालिका निवडणुकीपूर्वी आपल्याच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

congress
शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती! उन्हामुळे सकाळी भरणार शाळा

नगरसेवकांना विचारूनच कार्यक्रमाला गेलो...
नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी त्यांच्या प्रभागातील विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी मला निमंत्रण दिले होते. त्यानंतर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्या प्रभागातील नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेविका अंबादास करगुळे यांचे पती युवकाध्यक्ष अंबादास करगुळे यांना विचारले होते. नगरसेवक विनोद भोसले यांचा कॉल लागला नाही. त्यांना विचारून गेल्यानंतरही असे आरोप सोशल मीडियातून करायची काय गरज, त्यामागे नेमके काय राजकारण आहे, हे माहिती नाही. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगण्याऐवजी माध्यमातून असा आरोप केल्याने पक्षाचीच बदनामी होते, असेही वाले म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()