कोणत्या पक्षात गटबाजी नाय... सर्वच पक्षात ती कमी-अधिक प्रमाणात हायेच... राजकारण म्हनलं की ते आलंच ना...
कोणत्या पक्षात गटबाजी नाय... सर्वच पक्षात ती कमी-अधिक प्रमाणात हायेच... राजकारण म्हनलं की ते आलंच ना... सत्तेवर येऊनबी कॉंग्रेसला (Congress) कायबी लाभ मिळत नाय... त्यामुळं कार्यकर्ते लईच वैतागले हायती. राज्यात जशी स्थिती हाय तशीच जिल्ह्यातबी... एकीकडं ही स्थिती तर दुसरीकडं पक्षाच्या अध्यक्षानं एकेका तालुका अध्यक्षाचे पंख कापण्याची मोहीमच आखलीया... तसंच सोलापूर जिल्ह्यात पक्षाच्या अध्यक्षाइरोधात मोट बांधण्याची योजना सुरू झालीया... जिल्हाध्यक्ष पानीवकरबी काय कमी नाईत, त्येंनी बी एकेका तालुका अध्यक्षाला पदावरून हटवायचा ईडाच उचलला हाय... त्याची सुरवात सांगोल्यातून झालीया..! (Factionalism within the Congress party in district politics-ssd73)
कॉंग्रेसचा शहराध्यक्ष अन् जिल्हाध्यक्ष बदला अशी कार्यकर्त्यांकडून नेहमीच मागणी होत असते. प्रत्येकवेळी बंड पुकारलं जातं... अन् नंतर ते शमतंबी... पण आताचं बंड लईच येगळं दिसू लागलंया... सगळ्याच तालुकाध्यक्षांना बदलण्याची मोहीम सुरू झालीया... त्येंनीबी जिल्हाध्यक्षाइरोधात तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरवात केली हाय... जिल्ह्यातील अकरापैकी आठ अध्यक्षांनी एकत्र येऊन जिल्हाध्यक्षाइरोधात बैठक घेतली. अध्यक्ष बदलण्याची मागणी केली. यासाठी मंगुड्याच्या वकीलसायबांनी पुढाकार घेतला हुता... हे सगळं झालं... पण ते कागदावर कुठंच आणलं गेलं नाही... त्येची मात्र लईच काळजी घेतली गेली. या बैठकीची कुणकुण लागताच पानीवकरबी लईच खवळलं की... त्येंनी थेट सांगोल्याच्या अध्यक्षाचं कलमच बार केलं... आता अजून पाच-सहाजण पाईपलाईनमधी हायती म्हणत्यात... अध्यक्ष पानीवकरांनी हे केलं तसं इरोधी गटानं त्येंच्याइरोधात लईच कुभांड रचलं... आता जिल्हाध्यक्ष बदलत्यात की तालुकाध्यक्ष हे पाहणं मोठ्ठं गंमतीशीर राहील.
इधानपरिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या इलेक्शन जवळ येऊ लागल्याती... त्यासाठी तयारी करण्यापेक्षा राजकारण करून तू मोठ्ठा की मी... यामध्येच अडकलेल्या कॉंग्रेसची स्थिती कशी राहील, याचीच चर्चा पारावर होऊ लागलीया... शहरातबी महापालिका निवडणुका लवकरच हायती... शहराध्यक्ष प्रकाशइरोधातील वातावरण सध्या तरी निवळलं हाय... कॉंग्रेसचा येक पदाधिकारी रसाळदार बोलतच बंडाचा झेंडा उचलला हुता... सायबांनी मध्यस्थी केल्यानंतर बंड शमले. तवा कोरोनाच्या आजारातून उठल्याचं निमित्त करत शहराध्यक्षांचे कॉंग्रेस भवनात जंगी स्वागत करण्यात आलं हुतं... या मागचं कारण समद्यांना ठाव हाय... इधान परिषद अन् महापालिकेच्या निवडणुकीच्या फुढं फुढं परत हालचालींना वेग येईलच असं वाटतंया... पाहू या काय हुतंय ते !
- थोरले आबासाहेब
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.