सोलापूर : जिल्ह्यात सततच्या पावसाचा फटका उडीद व मूग पिकांना बसला आहे. सोलापूर बाजार समितीत उडीद व मुगाची आवक होत आहे. मात्र, बाजारात आलेल्या मालात सुमारे ८५ टक्के माल खराब आहे. .सध्या बाजारात उडदाचा दर प्रतिक्विंटल साडेसहा हजार ते साडेआठ हजारांपर्यंत तर मुगाचा दर सात हजार ते आठ हजारापर्यंत आहे. परंतु, दर्जा घसरल्याने कमी दरात माल विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.यंदा जिल्ह्यात सुरवातीपासून चांगला पाऊस पडल्याने खरिपाची विक्रमी चार लाख ७९ हजार २३० हेक्टरवर पेरणी झाली. त्यात उडदाचे एक लाख ५ हजार ५२८ हेक्टर तर मुगाचे एक लाख तीन हजार २८६ हेक्टर क्षेत्र आहे. म्हणजे एकूण पेरणी क्षेत्रात दोन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्र या दोन्ही पिकांचे आहे. .यंदा चांगला पाऊस झाल्याने हाती पैसाही येईल, या भरवशाने शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांची पेरणी केली. मात्र, यंदा पावसाळ्यातील तीन महिन्यांत ४० दिवस पडलेला पाऊस, त्यामुळे सोकावलेल्या पिकांमुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यातच सततच्या पावसात काढणीपूर्वी व काढणीनंतर भिजल्यामुळे मालाचा दर्जा घसरला आहे. परिणामी बाजारात कमी दराने माल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.सोमवारी सोलापूर बाजार समितीत ५०० क्विंटल उडीद, १०० क्विंटल मुगाची आवक झाली. चांगल्या दर्जाच्या उडदाला प्रतिक्विंटल सात हजार ४०५ ते आठ हजार ६०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण आठ हजार ४८० रुपये दर मिळाला. .तर दर्जा घसरलेला माल सहा हजार ५०५ रुपये दराने विकावा लागला. तीच स्थिती मुगाचीही असून पिवळा मूग नऊ हजार ७९९ रुपयांना विकला गेला. मात्र, दर्जा खालावलेला पिवळा मूग पाच हजार ३०० तर चमकी सहा हजार २०० ते आठ हजार २०० रुपयांना विकला.मुगाचे अधिक नुकसानसोलापूर बाजार समितीत मंगळवारी उडीद प्रतिक्विंटल सहा हजार ५०५ ते आठ हजार ६४० रुपये दराने विकला गेला. सर्वसाधारण आठ हजार ४७५ पर्यंत दर मिळाला..चमकी मूग सहा हजार ९८५ ते आठ हजार १९५ रुपये तर पिवळा मूग आठ हजार ५०० रुपयाला विकला गेला. बाजार समितीत उडदाच्या तुलनेत मुगाची आवक कमी असली तरी विशेषतः त्याचे नुकसान अधिक झाल्याचे दिसते. बाजार समितीत आलेला मूग खराब असल्याचे दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने विकावा लागत आहे.प्रत घसरल्याने हमीभावापेक्षा कमी दरपावसामुळे उडीद, मुगाची प्रत घसरल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बाजारात येणाऱ्या मालात ८५ टक्के मालाची प्रत घसरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. विकल्या गेलेल्या चांगल्या मालाचा दर पाहता हमीभावाहून अधिक दर मिळत असल्याचे दिसते. .मात्र, तो माल ठराविक असतो. एकूणच प्रत घसरल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने माल विकावा लागत आहे. उडदाचा हमीभाव सात हजार ४०० तर मुगाचा हमीभाव आठ हजार ६८२ रुपये आहे.सध्या बाजारात येत असलेला उडीद, मूग पावसात भिजल्याने खराब झाला आहे. काढणीपूर्वी व काढणीनंतर ढीग केल्यावरही पावसाचा फटका बसला आहे. बाजारात येणाऱ्या मालातील १५ टक्के माल हा चांगल्या दर्जाचा आहे. सध्या दोन्ही पिकांना हमीभावाच्या तुलनेत चांगला दर मिळत आहे. मात्र, दर्जा खालावल्याचा दरावर परिणाम झाला आहे.- अरुण बिराजदार, आडत व्यापारी, बाजार समिती, सोलापूर.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.