दिवाळीत सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाईमधून फळपिके वगळली

दिवाळीत सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाईमधून फळपिके वगळली; केवळ एक हेक्‍टरची मदत
दिवाळीत सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा
दिवाळीत सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टाSakal
Updated on
Summary

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्तर सोलापूर तालुक्‍यात मदत देताना शासनाने फळपिकेच वगळली आहेत.

उत्तर सोलापूर : ऐन दिवाळीत (Diwali) सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्तर सोलापूर (North Solapur) तालुक्‍यात मदत देताना शासनाने फळपिकेच वगळली आहेत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना केवळ एक हेक्‍टरचीच मदत देऊन त्यांची बोळवण केली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.

दिवाळीत सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा
सरव्यवस्थापकाच्या त्रासामुळे डीसीसी कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती!

उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वडाळा मंडलामध्ये सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी 143 मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. अतिवृष्टी झाल्याने या मंडलातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. तसा अहवाल शासनाला पाठवला होता. उद्धव ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिरायती पिकांस दहा हजार रुपये, बागायती पिकांसाठी पंधरा हजार रुपये तर फळपिकांसाठी पंचवीस हजार रुपयांची मदत हेक्‍टरनिहाय जाहीर केली होती. दोन हेक्‍टर मर्यादेत मदत देण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता. सरकारने घेतलेला निर्णय व प्रत्यक्षात झालेली अंमलबजावणी यामध्ये मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात माती घालण्याचा हा प्रकार असल्याच्या तिखट प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटू लागल्या आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्‍यात जवळपास 40 हेक्‍टरवर फळपिकांचे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाने नुकसान भरपाईतून फळपिके वगळली आहेत. फळपीक वगळून जिरायत व बागायत असलेल्या शेतकऱ्यांना केवळ एक हेक्‍टरपर्यंतच मदत देऊ केली आहे. अशाप्रकारची तोकडी मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. शेतकऱ्यांना एक ते दीड हजारापासून पाच ते सहा हजार रुपयांपर्यंतची मदत हेक्‍टरपर्यंत मिळाली आहे. दोन हेक्‍टरची मदत सरकारकडून मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाने केवळ एक हेक्‍टरचीच मदत उत्तर सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना देऊन त्यांची बोळवण केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांमध्ये शासनाबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. बुधवारी रात्री उत्तर सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिशय तोकडी रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सरकार घोषणा करते एक आणि प्रशासन अंमलबजावणी करते अशी वेगळीच स्थिती या मदत वाटणीमुळे झाली आहे.

दिवाळीत सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा
निसर्गाचा चमत्कार! म्हशीला झाले चक्क पांढरे सफेद रंगाचे रेडकू

मुख्यमंत्र्यांचा शब्द ठरविला खोटा

उत्तर सोलापूर तालुका प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी मदतीबाबतचा दिलेला शब्द खोटा ठरविला आहे. मुख्यमंत्र्यांनी जिरायतीसाठी प्रतिहेक्‍टरी दहा, बागायतीसाठी 15 तर फळपिकांसाठी पंचवीस हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रशासनाने केवळ एक हेक्‍टरची मदत दिली आहे. एवढेच नाही, तर फळपिके मात्र या मदतीपासून वगळली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला मदतीचा शब्द प्रशासनाने खोटा ठरविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.