शेतकऱ्याच्या लेकीनं आपल्या कराटे फाइटनं वातावरण केलं ताईट!

दिक्षा पवार हिने गोव्यात फडकाविला तिरंगा
Farmers Leki
Farmers Leki
Updated on

मोहोळ( सोलापुर) : खंडाळी ता मोहोळ येथील शेतकरी (Farmer) कुटुंबातील दीक्षा दीपक पवार या विद्यार्थिनीने घरची परिस्थिती हलाखीची असतानाही कराटे या क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश मिळवले आहे.गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय आजिंक्य पद (National Ajinkya Pada) कराटे स्पर्धत दिक्षा हिने भारतात प्रथम क्रमांक मिळविला आहे. नेपाळ येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय कराटे (International Karate) स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. दीक्षा च्या माध्यमातून खंडाळी सह मोहोळ तालुक्याच्या शिरपेचात तिने मानाचा तुरा खोवला आहे. गेल्या आठवड्यात गोवा येथे झालेल्या याच क्रीडा स्पर्धेत यश मिळवल्या नंतर तिने तिथे भारताचा तिरंगा ध्वज (India tricolor) फडकाविला.

Farmers Leki
कारसह खाडीच्या चिखलात अडकलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

दीपक पवार हे खंडाळी येथील गरीब शेतकरी आहेत. पती-पत्नी तुटपुंज्या शेतीवर काबाडकष्ट करून प्रपंच चालवतात. दीक्षा ही शंकरराव मोहिते पाटील ज्युनियर कॉलेज शेटफळ ची विद्यार्थिनी आहे. लहानपणा पासूनच तिला खेळाची आवड होती. तिच्यातील या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वडिलांनीही कंबर कसली.दिक्षा विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन करू लागली. दीक्षा हिने आजपर्यंत सुवर्ण, कास्य,व ब्राँझ अशा अनेक पदकांची या क्रीडा स्पर्धा प्रकारात कमाई केली आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दीक्षा शाळेतून आल्यावर आजही आई-वडिलांना शेती कामात मदत करते.

Farmers Leki
स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला शिवविचार समजतील

यापूर्वी दीक्षा हिने हिमाचल प्रदेश, बालेवाडी, धुळे, पुणे, लातूर, बारामती, नागपूर, गोवा आदी ठिकाणी कराटे या क्रीडा प्रकारात मैदान गाजवुन आली आहे. गेल्या आठवड्यात गोवा येथे झालेल्या स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला, त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकाविला. तिची आता नेपाळ येथील क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दीक्षा हिने राज्यस्तरावर अठरा वेळा, राष्ट्रीय स्तरावर चार वेळा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेळा आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला आहे. तिला अखिल भारतीय खेल महासंघाचा किक बॉक्सिंग गेम, टायटल बेल्ट, सोलापूर विजेता असे पुरस्कारही मिळाले आहेत. या सर्व यशप्राप्ती साठी कॉलेजमधील क्रीडाशिक्षक श्रीकांत पुजारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर आई-वडिलांसह आजोबा, चुलते यांनी प्रेरणा दिली म्हणूनच मी हे यश संपादन करु शकले असे तिने सांगितले. भविष्यात उत्तम क्रीडा शिक्षक होण्याचा मानस तिने बोलून दाखविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.