बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात रानडुकरे सहसा दिसून येत नाहीत; कारण त्या परिसरात बिबट्याचं वास्तव्य आहे, हे रानडुकरांना समजते. मग ते तेथून पळ काढतात.
सोलापूर : हिंस्र प्राण्यांपासून स्वत:चा बचाव व्हावा यासाठी अनेक प्राण्यांमध्ये काही नैसर्गिक देणग्या लाभलेल्या असतात. उदाहरणार्थ जंगलात एखादा सिंह (Lion), बिबट्या (Leopard) किंवा वाघासारखा (Tiger) हिंस्र प्राणी दिसून आल्यास जंगलातील माकडे, वानरे व इतर पक्षी परिसरातील प्राण्यांना दक्षतेचा इशारा देतात. त्याचप्रमाणे बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात रानडुकरे (Boars) सहसा दिसून येत नाहीत; कारण त्या परिसरात बिबट्याचं वास्तव्य आहे, हे रानडुकरांना समजते. मग ते तेथून पळ काढतात. रानडुकरांचा परिसरातून पसार होणे यावरून माणसांनी समजावे की तेथे एखाद्या हिंस्र प्राण्याचे वास्तव्य आहे. रानडुकरांना बिबट्या तेथे असल्याचा सुगावा लागतो कसा, जाणून घ्या सविस्तर. (Farmers should understand that leopard is a part of nature cycle-ssd73)
ज्या परिसरात बिबट्याचा वावर असतो, त्या परिसरातून रानडुकरे पसार होतात. कारण, बिबट्याच्या विष्ठेचा वास. बिबट्या त्या परिसरात टाकलेल्या विष्ठेचा वास जरी आला तरी रानडुकरांचे कळप तो परिसर सोडून इतरत्र स्थलांतर करतात. यामुळे शेतकऱ्यांना सावधगिरीची इशारा मिळतो. बिबट्या आला म्हणून शेतकऱ्यांनी मोठे संकट आले आहे असे न मानता तोदेखील निसर्गचक्राचा एक भाग आहे, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा (Bharat Chheda) यांनी केले आहे.
सोलापूर शहराच्या (Solapur City) अगदी जवळ असलेल्या कोंडी - चिंचोळी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना व नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकरी जयश्री पवार यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढला आहे. सामन्यपणे पंढरपूर (Pandharpur), करमाळा (Karmala), माढा (Madha), मोहोळ (Mohol), मंगळवेढा (Mangalwedha) या तालुक्यांत आजवर बिबट्याचा वावर आढळला आहे. दर चार ते सहा महिन्याला सीना नदीच्या ऊसशेती पट्ट्यात व भीमा नदीकाठच्या परिसरातून बिबट्याचा प्रवास होतो. सध्या आलेला बिबट्या हा असाच प्रवासी पाहुणा आहे. तो अन्न व निवाऱ्याच्या शोधात आलेला आहे. तो येथे कायमस्वरूपी राहणारा नाही.
मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले की, बिबट्या हा अत्यंत लाजाळू व शक्यतो रात्रीच फिरणारा आहे. मानव किंवा शेळ्या हे त्याचे मुख्य खाद्य नाही. भटकी कुत्री, रानडुकरे, हरिण, ससा अगदी उंदीर, घुशी देखील खाऊन तो गुजराण करतो. बिबट्याची विष्ठा ज्या भागात पडेल, तो परिसर रानडुकरे सोडून देतात. त्यांना बिबट्याच्या विष्ठेच्या वासावरून त्याचा येथे वावर असल्याचे समजते व ताबडतोब त्याच्या भीतीने रानडुकरे पसार होतात.
सध्या रानडुकरांमुळे होणारे शेतीचे नुकसान ही मोठी समस्या आहे. काही राज्यांत रानडुकरे हे उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्रात रानडुकराच्या शिकारीला बंदी आहे. यामुळे रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यांचा उसासारख्या पिकात रहिवास असतो. ते उसासह इतर पिकांचेही नुकसान करतात. पिके खाण्याबरोबरच तुडवून नुकसान करण्याचा उपद्रव रानडुकरे देतात. यामुळे शेतकऱ्यांसाठी रानडुकरांची समस्या नैसर्गिक साखळीद्वारे कमी होण्यासाठी बिबट्याची मदत होणार आहे. मात्र, बिबट्याला माणसांपासून उपद्रव झाल्यास तो माणसांवरही हल्ले करतो. यासाठी बिबट्याला उपद्रव न देता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात बिबट्याचा वावर आढळलेली ठिकाणे
वांगी नं. चार (ता. करमाळा) : येथे बिबट्याकडून चार हल्ले; तीनजण ठार
वाळूज (ता. मोहोळ) : 26 जानेवारी रोजी एक बालक ठार
दोन महिन्यांपूर्वी भोयरे (ता. मोहोळ) : येथे रेडकू ठार
गतवर्षी मार्च महिन्यात पंढरपूर तालुक्यात पेनूर परिसरात आढळला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.