शेतकऱ्यांसाठी खुषखबर! बॅंकांकडून मिळणार आता वाढीव पीककर्ज

शेतकऱ्यांसाठी खुषखबर! बॅंकांकडून मिळणार आता वाढीव पीककर्ज
crop loan
crop loanSakal
Updated on
Summary

शेतीचे अपेक्षित उत्पन्न व हवामानाचा अंदाज, यावरून जिल्ह्यातील पीककर्जाची मर्यादा ठरविण्यात आली.

सोलापूर : शेतीचे अपेक्षित उत्पन्न व हवामानाचा अंदाज, यावरून जिल्ह्यातील पीककर्जाची (Crop Loan) मर्यादा ठरविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा (Crop Insurance) उतरवूनही अपेक्षित विमा रक्‍कम मिळत नसल्याने आता पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी घेतला आहे. त्यामुळे आता 1 एप्रिल 2022 पासून जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव कर्ज मिळणार आहे. (Farmers will now get increased crop loans from banks)

राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटी (State Level Bankers Committee), कृषी विकास अधिकारी (Agriculture Development Officer) आणि मागील पीकनिहाय कर्ज मर्यादेचा अभ्यास करून त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बॅंकांनी जिल्ह्यातील जवळपास दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना कर्जवाटपही केले आहे. मात्र, आता कर्ज मर्यादा वाढविल्याने बहुतेक शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.

तत्पूर्वी, जिल्ह्यातील जवळपास 26 बॅंकांनी मागील खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षाही अधिक कर्जवाटप केले आहे. आता रब्बी हंगामाचे कर्जवाटप सुरू असून आतापर्यंत केवळ 22 टक्‍क्‍यांपर्यंतच कर्ज वितरीत करण्यात आले आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाची बिले मिळाल्यानंतर पूर्वीचे कर्ज भरून संबंधित शेतकऱ्यांना नव्याने कर्जवाटप केले जाते. त्यानंतर रब्बीचे कर्जवाटप वाढलेले दिसेल, असेही जिल्हा अग्रणी बॅंकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, पीक कर्जासाठी पात्र असलेल्या कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासह जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर (Prashant Nashikkar) यांनीही बॅंकांना केल्या आहेत. तसेच कर्ज मर्यादा वाढल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

वाढीव कर्ज मर्यादा अशी (हेक्‍टरी)...

  • पिकाचा प्रकार - आताची मर्यादा - वाढीव मर्यादा

  • ऊस - 95,000 - 1.15 लाख

  • डाळिंब - 1.30 लाख - 1.44 लाख

  • फळबागा - 40,000 - 1,00000

  • द्राक्ष - 2.10 लाख - 2.45 लाख

  • केळी - 1.30 लाख - 1.40 लाख

  • खोडवा, निडवा ऊस - 65,000 - 75,000

शेती पिकांची कर्ज मर्यादा वाढविण्याच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा बॅंकेकडून त्यासंबंधीचा ड्राफ्ट तयार झाल्यानंतर एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल.

- प्रशांत नाशिककर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर

शेतकऱ्याची 'ईडी'पर्यंत धाव

शेतात पीक असतानाही अनेकांना कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा अग्रणी बॅंकेकडे प्राप्त होत आहेत. दरमहा सरासरी आठ ते दहा तक्रारी प्राप्त होतात. मात्र, अनेकांकडे पूर्वीचे कर्ज थकीत असल्याने, क्षेत्र कमी असल्याने त्या पिकांवर तेवढे कर्ज देता येत नसतानाही काहीजण अर्ज करीत असल्याची स्थिती आहे. महूद येथील एका शेतकऱ्याने त्यासंबंधीची तक्रार थेट 'ईडी'कडे व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडेही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.