मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सुलतानपूर (ता. माढा) येथील राहुल शिंदे यांना शासकीय पातळीवरून न्याय मिळत सुलतानपूरचे नामांतर राहुलनगर असे झाले आहे.
माढा (सोलापूर) : अखेर बारा वर्षांनंतर मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात (26/11 attacks on Mumbai) शहीद झालेल्या सुलतानपूर (Sultanpur) (ता. माढा) (Madha Taluka) येथील राहुल शिंदे (Rahul Shinde) यांना शासकीय पातळीवरून न्याय मिळत सुलतानपूरचे नामांतर राहुलनगर (Rahulnagar) असे झाले आहे. सातबाराचे उतारे व शासनाच्या इतर ऑनलाइन प्रणालीमध्ये आता सुलतानपूरऐवजी राहुलनगर असे नाव दिसू लागल्याने शहीद राहुल शिंदे यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये राहुल शिंदे हे शहीद झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय व सामाजिक पातळीवरून मदतही झाली होती. ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी सुलतानपूर गावाचे नाव बदलून ते शहीद राहुल शिंदे यांच्या नावावरून राहुलनगर असे करावे, अशी मागणी शासकीय दरबारी केली होती. या मागणीला प्रत्यक्ष न्याय मिळण्यामध्ये बारा वर्षांचा कालावधी गेला. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने 3 जुलै 2020 रोजी दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासनाने 18 सप्टेंबर 2020 रोजी राजपत्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोमवारी (ता. 13) शासनाच्या सर्व ऑनलाइन प्रणालीवर "राहुलनगर' असे नाव दिसू लागल्याने शहीद राहुलचे यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शहीद राहुल यांच्या बलिदानाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. राहुलनगर असे नामांतर झाल्यामुळे शहीद राहुल यांचा इतिहास सर्वांच्या नजरेसमोर कायमस्वरूपी राहणार असून, या बलिदानातून अनेक युवक प्रेरणा घेतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व राहुल यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
सुलतानपूरचे नामांतर शहीद राहुल यांच्या नावावरून राहुलनगर असे केल्याने यापासून अनेक तरुण प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी पुढे येतील. राहुलनगर असे नामांतर करण्यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार.
- सुभाष शिंदे, वीरपिता, राहुलनगर
सोमवारी (ता. 13) सायंकाळच्या सुमारास शासनाच्या सर्व ऑनलाइन प्रणालीमध्ये राहुलनगर असे नाव दिसू लागले. राहुलनगर असे नामांतर झाल्याने शहीद राहुल यांच्या बलिदानाला न्याय मिळाला आहे. यामुळे शहीद राहुल यांच्या स्मृती चिरकाल युवकांना प्रेरणा देतील.
- प्रवीण शिंदे, राहुलनगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.