Mohol News : अखेर अप्पर तहसील कार्यालय झाले मंजुर, 43 गावांचा होणार समावेश

अनगर, ता. मोहोळ येथे अखेर अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले असून, यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेत होणार आहेत.
Former MLA Rajan Patil
Former MLA Rajan Patilsakal
Updated on

मोहोळ - अनगर, ता. मोहोळ येथे अखेर अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले असून, यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेत होणार आहेत. मोहोळ तहसील कार्यालया वरील ताण कमी होणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यात 104 महसुली गावांचा समावेश आहे. 2011 च्या जनगणने नुसार तालुक्याची लोकसंख्या दोन लाख 76 हजार 920 इतकी आहे. तालुक्याचे वाढते शहरीकरण यामुळे वाढलेल्या प्रशासकीय कामकाजाचा निपटारा जलद गतीने करण्याकरिता तसेच नागरिकांच्या सोयीसाठी अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल होता.

त्या नुसार दाखल प्रस्तावास मान्यता देण्यात येत असल्याचे पत्र महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मोहोळचे तहसीलदार यांच्याशी चर्चा करून तहसील कार्यालयाचे विभाजन करावे व अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे असेही आदेशात नमुद केले आहे.

एक अप्पर तहसीलदार, एक नायब तहसीलदार, एक अव्वल कारकून व चार महसूल सहाय्यक अशी पदे उपलब्ध करून द्यावीत असे ही आदेशात नमुद करण्यात आले आहे. या अप्पर तहसील कार्यालयाच्या अधिपत्याखाली अनगर, शेटफळ, नरखेड, पेनुर या चार महसूल मंडळातील 43 गावांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी अनगर येथेच दुय्यम निबंध कार्यालय मंजूर झाले होते.

मात्र ते होऊ नये म्हणून अनेक राजकीय पक्षांनी, तसेच इतरांनी आंदोलने, रास्ता रोको केली होती, मात्र अखेर कार्यालय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत 25 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आले. त्याच वेळी अप्पर तहसील कार्यालय ही मंजूर करून असा शब्द महसूल मंत्री विखे पाटील यांनी जाहीर सभेत दिला होता.

प्रतिक्रिया -

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला शब्द पाळला. ते शब्द पाळणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या तीन पिढ्या राजकारणात आहेत. अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्यामुळे आम्हाला मनस्वी आनंद झाला आहे. शेतकऱ्यांची सोय झाली आहे, त्यांचे नुकसान होणार नाही, तसेच कामे वेळेत होतील.

- राजन पाटील, माजी आमदार मोहोळ

तहसील कार्यालयाला आमचा विरोध नाही, परंतु आमचे पेनुर मंडळ अनगर अप्पर ला जोडले आहे. त्याला आमचा विरोध आहे. कारण आम्हाला त्या ठिकाणी जाण्याचे अंतर जास्त आहे आमचे मंडल त्यातून रद्द व्हावे यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत.

- रमेश माने, विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा

शासकीय परिपत्रका नुसार कार्यवाही होईल. पदे भरल्या वर कामकाज सुरू होईल.

- सचीन मुळीक, तहसीलदार मोहोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.