परवानगीशिवाय होर्डिंग लावल्यास 40 हजारांचा दंड, मालमत्तेवरही बोजा

अंमलबजावणी करताना कागदी घोडे नाचवले जात असल्याची स्थिती अनेकादा पहायला मिळते
अनधिकृत होर्डिंग.
अनधिकृत होर्डिंग. Sakal
Updated on

सोलापूर : शहरात अनधिकृत फलक (होर्डिंग), फ्लेक्‍स, बॅनर लावून विद्रूपीकरण करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. कोणाचीही परवानगी न घेता होर्डिंग लावल्यास प्रतिस्क्‍वेअर फूट चार रुपये 40 पैसे, याप्रमाणे दंड आकारला जाणार आहे. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांकडून 40 हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्याने दंड न भरल्यास संबंधित जागा मालकाच्या जागेवर बोजा चढविला जाईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात कोणत्याही प्रकारचे डिजिटल फ्लेक्‍स लावण्यावर बंदी होती. परंतु, 2018 मध्ये महापालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव करून 71 ठिकाणी व्यावसायिक फलक लावण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रशासनाने धोरण निश्‍चित केले, तरीही प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना कागदी घोडे नाचवले जात असल्याची स्थिती अनेकादा पहायला मिळते.

अनधिकृत होर्डिंग.
औरंगाबाद : बिबट्याचा मुक्काम आता पाटोदा शिवारात

आउट डोअर मार्केटिंगसाठी राजकारणी अथवा काही खासगी कंपन्या मोठ्या होर्डिंगला प्राधान्य देतात. शहरातील मोक्‍याचे चौक, रस्त्याच्या ठिकाणी होर्डिंग लागावेत म्हणून सर्वजण प्रयत्न करतात. महापालिकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च 2021 पासून शहरातील 71 ठिकाणी व्यावसायिक होर्डिंगला परवानगी देण्यात आली आहे. त्यातून मागील आठ महिन्यात महापालिकेला जवळपास नऊ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

बेकायदा डिजिटलवर कारवाई नाहीच

शहरात मोठ्या होर्डिंगप्रमाणे चौकाचौकात लागणारे बेकायदा बॅनर, बोर्ड, झेंडे याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. शहरात राजकीय कार्यक्रम असल्यास अथवा नेत्यांचा वाढदिवस असल्यास चौकांमध्ये अनधिकृत बॅनर, होर्डिंग लावलेले चित्र पहायला मिळते. त्यावर ठोस काहीच कारवाई केली जात नाही. त्यावरही आता दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. व्यावसायिक जाहिरातीसाठी परवानगी घेऊन खासगी फलक लावल्यास संबंधित एजन्सीचा परवाना रद्द केला जाणार आहे. तर बेकायदा होर्डिंग लावल्यास त्या फलकांवरील व्यक्‍तींवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे महापालिकेतील जाहिरात व परवाना विभागाकडून सांगण्यात आले.

अनधिकृत होर्डिंग.
अकोला : रिसोडच्या मुख्य रस्त्याचा वनवास संपेना

झेंडा लावल्यास एक हजारांचा दंड

राजकीय कार्यक्रमावेळी रस्त्याच्या कडेला, रस्ता दुभाजकांवर झेंडे लावले जातात. त्यासाठी कोणीही परवानगी देत नाही. यापुढे अशाप्रकारे झेंडा, बोर्ड, बॅनर लावल्यास थेट दंड केला जाणार आहे. एक ते 10 बोर्ड अथवा झेंड्यासाठी किमान एक हजारांचा दंड केला जाणार आहे. तर 10 पेक्षा अधिक बोर्ड, झेंडे असल्यास पाच हजारांपर्यंत दंड आकारला जाईल, असा इशाराही जाहिरात व परवाना विभागाने दिला आहे.

'ही' ठिकाणे नो डिजिटल झोन

छत्रपती संभाजीराजे चौक (जुना पुना नाका), छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक), रेल्वे स्टेशन चौक, सात रस्ता, डफरीन चौक याठिकाणी नो डिजिटल झोन जाहीर करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()