पांगरीच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीवर "महिलाराज' ! बार्शी तालुक्‍यात काही ठिकाणी सरपंचपदाचा तिढा 

Sarpanch
Sarpanch
Updated on

पांगरी (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील 15 सदस्य संख्या असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सोडत पद्धतीने सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी निघाल्याने सरपंच पदासाठी पत्नीची वर्णी लागावी यादृष्टीने जोरदार प्रयत्न चालू झाले आहेत. पांगरी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच महिला सरपंच म्हणून निवड होणार असून, चार सर्वसाधारण महिलांपैकी कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार, याकडे लक्ष लागले आहे. 

पांगरी ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच महिलेस सरपंचपदाचा बहुमान मिळणार आहे. बार्शी तालुक्‍यातील लोकसंख्या व सदस्य संख्येच्या बाबतीत क्रमांक दोनवर असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यात अटीतटीची लढत झाली. त्यात लोकनेते रघुनाथ दादा पाटील पॅनेलचे 13 सदस्य निवडून आले. विकास आघाडीमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गमधून सुवर्णा गाढवे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

सरपंच पदासाठी चार महिला दावेदार ठरू शकतात. यामध्ये मनीषा धस, रेणुका मोरे, सुरेखा लाडे, हिराबाई काकडे या चार महिला सर्वसाधारणमधून निवडून आल्या आहेत. यात सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे लक्ष लागले आहे. 

पांढरी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असून या पदाकरिता दोन महिला सदस्य शेतकरी विकास आघाडीच्या शोभा अशोक घावटे, मीनाबाई बाळासाहेब घावटे या दावेदार आहेत. यात मीनाबाई घावटे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

उक्कडगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलाकरिता आरक्षित आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये राऊत गटाचे भगवान बाबा ग्रामविकास आघाडीने सहा जागा मिळवून बहुमत सिद्ध केले आहे. पांगरी भागात या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये संगीता बिभीषण सानप या नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवरून विजयी झाल्या आहेत. तर संगीता श्रीपती घुले, सुवर्णा मुंढे या सर्वसाधारण जागेवरून विजयी झाल्या आहेत. त्याही सरपंच पदाचे दावेदार ठरू शकतात. मात्र त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. 

घोळवेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पदांचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष म्हणून जाहीर झाले आहे. यामध्ये कल्याण माणिक तोगे, लक्ष्मण घोळवे हे दोघे सरपंच पदासाठी दावेदार ठरत आहेत. यात कोणीची वर्णी लागते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

ममदापूर ग्रामपंचायतीत हॅट्ट्रिक करत सातही जागांवर राऊत गटाचे आई तुळजभवानी ग्रामविकास पॅनेलच्या सदस्यांनी विजयी मिळविला आहे. आता नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतमध्ये सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. या सरपंच पदासाठी रेणुका अंकुश घोडके, उषा दीपक खळदकर, अश्विनी हनुमंत मोरे या तीन महिला दावेदार ठरत आहेत. 

गोरमाळे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी चुरशीची लढत झाली. त्यात सोपल गटाच्या श्री सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडीने सात जागा जिंकल्या तर जनसेवा ग्रामविकास आघाडीस दोन जागांवर समाधान मानावे लागले. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जाहीर झाले. त्यामुळे नागरिकांचा मागास प्रवर्गमधून एकमेव राजेंद्र दत्तात्रय पाटील हे निवडून आल्याने यांची सरपंचपदी वर्णी लागणार आहे. 

पांगरीपासून दोन कि.मी. अंतरावरील पुनर्वसित जहानपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आहे. येथील ग्रामपंचायतीच्या सात सदस्य संख्येपैकी पाच जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. उर्वरित दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या असतानाही या जागेवर एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने दोन्हीही जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे सरपंचाविना गाव असे काही दिवसांसाठी राहावे लागणार आहे. 

शिराळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आहे. येथे येडेश्वरी ग्रामविकास आघाडीला चार जागा मिळाल्या आहेत. राजेंद्र राऊत ग्रामविकास पॅनेलने पाच जागा मिळवून बहुमत प्राप्त केले होते. मात्र बहुमत झालेल्या पॅनेलकडे ओबीसी महिलेची जागा नसल्याने येडेश्वरी ग्रामविकास आघाडी एकमेव ओबीसी महिला निमा बाळासाहेब अंकुशे यांची सरपंचपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

धानोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपद आरक्षण सोडतीमध्ये आरक्षण ओबीसी महिलेसाठी निघाले आहे. येथील येमाईदेवी ग्रामविकास आघाडीने सातपैकी सहा जागा जिंकल्या असून त्याच आघाडीच्या ज्योत्स्ना आनंद जमदाडे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.