Pandharpur Rain: पंढरपुरात चंद्रभागेला आला पूर; इशारा पातळीवरून वाहतेय नदी

Pandharpur Flood: उजनी धरणातून सायंकाळी सात वाजता पुन्हा विसर्ग वाढवला जाणार असून तो 1 लाख 25 हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे.
Pandharpur Rain
Pandharpur Rain: पंढरपुरात चंद्रभागेला आला पूर; इशारा पातळीवरून वाहतेय नदी sakal
Updated on

Ujani Dam: भीमा आणि नीरा खोर्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदी इशारा पातळीवरुन वाहू लागली आहे. पूराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहरासह नदीकाठच्या 42 गावांना सावधानतेचा इशारा दिली आहे. सोमवारी (ता.5) सायंकाळी पंढरपुरात चंद्रभागा 35 हजार क्युसेकने वाहत आहे. दरम्यान उजनी धरणातून सायंकाळी सात वाजता पुन्हा विसर्ग वाढवला जाणार असून तो 1 लाख 25 हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी झाला आहे. सध्या 33 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. मंगळवार (ता.6) सकाळ पर्यंत चंद्रभागा धोका पातळी गाठेल असा अंदाज आहे.

दरम्यान पूरजन्य परिस्थिती लक्षात घेता शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाई पटांगणातील जवळपास 75 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. या सर्व कुटुंबाची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असली तर भीमा आणि नीरा खोर्यात मात्र जोरदार पाऊस सुरु आहे.

Pandharpur Rain
Prakash Ambedkar यांचे Pandharpur मध्ये खळबळजनक वक्तव्य । Manoj Jarange ।

या पावसामुळे नीरा आणि भीमा दुथडी भरून वाहू लागली आहे. भीमा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने तालुक्यातील सहा कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंढरपूर शहरातील जूना दगडी पूल देखील पाण्याखाली गेला आहे. चंद्रभागानदी पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर संताच्या मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने चंद्रभागानदी पात्रात होड्यांना प्रवेश बंदी केली आहे.

उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग अजूही मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यानंतर धरणातून भीमानदी पात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे भीमा नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे. नदी काठी राहणार्या लोकांनाही स्थलांतर करण्याचे काम सुरु झाले आहे. पाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्याने शेतकर्यांनी शेती पंपासह इतर साहित्य नदीपात्रा बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे.

Pandharpur Rain
Pandharpur Viral Video: ‘रिल’मुळे दीड वर्षांनी सापडली माऊली! छायाचित्रकाराच्या व्हिडिओमुळे मायलेकाची भेट

पंढरपुरातील सखल भागात पाणी येण्याची शक्यता

उजनी धरणातून आज सायंकाळी सात वाजता भीमा नदीपात्रात 1 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग सोडला जाणार आहे. हे पाणी उद्या (ता.6) सायंकाळ पर्यंत पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र नदीकाठच्या सखल भागात पाणी येण्याची शक्यता आहे. मागील वेळी चंद्रभागेत 1 लाख 25 हजार क्युसेक विसर्ग आल्यानंतर व्यास नारायण झोपडपट्टी सह अंबाबाई पटांगण या सखल भागात पाणी आले होते. उद्या चंद्रभागेतील विसर्गात वाढ झाल्यानंतर नदीकाठच्या झोपड्यांमध्ये पूराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने या भागातील लोकांना सुरक्षीत स्थळी हालविण्याचे काम सुरु केले आहे. नागरिकांनी पूरजन्य परिस्थिती लक्षात नदीपात्रात जाण्याचे धाडस करु नये असे आवाहन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी केले आहे.

Pandharpur Rain
Pandharpur Mahapuja : मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला सुरुवात; मंत्र्यांसह खासदार पूजेला उपस्थित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.