Airline Service: गोवा, मुंबईसाठी २३ डिसेंबरचा मुहूर्त पक्का

गोवा येथे मुख्यालय असणाऱ्या फ्लाय ९१ या कंपनीने सोलापूरला सेवा देण्याची अधिकृत घोषणा केली असून लवकर तिकिट विक्री खुली होणार आहे. सोलापूरला विमानसेवा देण्याची फ्लाय ९१ कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Airline Service
Airline ServiceSakal
Updated on

सोलापूर : गोवा येथे मुख्यालय असणाऱ्या फ्लाय ९१ या कंपनीने सोलापूरला सेवा देण्याची अधिकृत घोषणा केली असून लवकर तिकिट विक्री खुली होणार आहे. सोलापूर बरोबरच गोव्यातून जळगाव, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई या मार्गावर सेवा विस्तार करण्यात येणार आहे. २३ डिसेंबरला पहिले विमान उडणार आहे.

मुंबई, सोलापूर या दोन नवीन थेट मार्गांसह आपला विस्तार ९ गंतव्यस्थानांपर्यंत वाढविला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच ठिकाणांचा समावेश आहे. जळगाव, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई आणि सोलापूर येथे ही एअरलाईन जोडली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत, फ्लाय ९१ सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हवाई सेवा पुरवणारी ही पहिली एअरलाईन बनली आहे. या सेवेमुळे सोलापूरच्या व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. फ्लाय ९१ ने दोन नवीन थेट मार्गांची घोषणा केली आहे आहे.

Airline Service
Solapur Assembly Election 2024 : केंद्रांवरील हालचालींवर ड्रोनचे लक्ष

यामध्ये गोवा-सोलापूर आणि मुंबई-सोलापूर या सेवा आहेत. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे स्थित असलेली फ्लाय ९१ ही कंपनी सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग तसेच लक्षद्वीपमधील अगत्ती आणि बंगळुरू व हैदराबादसारख्या शहरात सेवा देत आहे.

लकवरच तिकिटे उपलब्ध

गोव्यात मुख्यालय असलेली ही एअरलाईन मार्च २०२४ पासून या मार्गावरील सेवेची तारी सुरू केली होती. फ्लाय९१ ची उड्डाणे २३ डिसेंबरपासून या दोन मार्गांवर सुरू होणार आहेत. लवकरच या मार्गांसाठी तिकिटे उपलब्ध होतील. या उड्डाणांच्या सुरवातीमुळे या ठिकाणादरम्यान जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सोय करण्याची हमी दिली आहे.

Airline Service
Solapur Assembly Election 2024 : लाडकी लालपरीही निवडणुकीच्या कामावर; प्रवाशांचे हाल

धार्मिक आणि सागरी पर्यटनाला फायदा

या दोन नवीन थेट मार्गांच्या घोषणेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे एअरलाईनचे उद्दिष्ट आहे. केंद्राच्या उड्डाण योजनेशी हे सुसंगत आहे असून दुर्लक्षित आणि दुर्गम भागांत हवाई प्रवासाची उपलब्धता करून देणे हा मुख्या उद्देश आहे.या सेवेमुळे सोलापूरमधील पंढरपूर व अक्कलकोट ही धार्मिक पर्यटन केंद्र गोव्याशी जोडली जाणार आहेत. तर सोलापूरच्या रहिवाशांसाठी गोव्याला सहज सागरी पर्यटनासाठी सहज पोहोचता येणार असल्याचे फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मनोज चाको यांनी सांगितले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.