नथीतून मारलेला तीर दाखवतोय लोकसभेचा रस्ता !

नथीतून मारलेला तीर दाखवतोय लोकसभेचा रस्ता !
नथीतून मारलेला तीर दाखवतोय लोकसभेचा रस्ता !
नथीतून मारलेला तीर दाखवतोय लोकसभेचा रस्ता !Canva
Updated on
Summary

अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पराभवात श्री. शिंदे यांचाच हात असल्याचा साक्षात्कार प्रा. ढोबळे यांना नुकताच झाला.

सोलापूर : माजीमंत्री तथा भाजप नेते प्रा. लक्ष्मण ढोबळे (Former Minister Laxman Dhoble) यांनी माजी केंद्रीय मंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Former Union Minister Sushilkumar Shinde) व आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्यावर शरसंधान साधले. अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Former Minister Siddharam Mhetre) यांच्या पराभवात श्री. शिंदे यांचाच हात असल्याचा साक्षात्कार प्रा. ढोबळे यांना नुकताच झाला. 2009 मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत प्रा. ढोबळे यांनी केलेली कारणमीमांसा असावी असा कयास आहे. या वक्तव्याने अडगळीतील प्रा. ढोबळे मात्र पुन्हा चर्चेत आले. नथीतून मारलेला हा तीर आता लोकसभा निवडणुकीपर्यंतचा रस्ता दाखवत आहे.

नथीतून मारलेला तीर दाखवतोय लोकसभेचा रस्ता !
मित्राकडून 19 कोटींची फसवणूक ! बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट

मंगळवेढ्यानंतर मोहोळ मतदारसंघातून निवडून येत मंत्रिपदाचा लाभ घेतलेल्या प्रा. ढोबळे यांना 2014 मध्ये आपला चेला रमेश कदमाकडूनच पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर राजकारणापासून दूर असलेले प्रा. ढोबळे यांचा केवळ प्रचारापुरताच वापर करण्यात येत आहे. बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर दौरे करून सामाजिक वातावरण ढवळून काढण्याची त्यांची योजना आहे. त्याअंतर्गत राजकारणविरहित दौरा करत समाज जागृतीचे काम प्रा. ढोबळे यांनी सुरू केले आहे. सोलापुरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात त्यांचे वक्तव्य राज्यभरात चर्चेत राहिले. राजकारणविरहित दौऱ्यात राजकारणावर बोलण्याची त्यांची ही खासियतच आहे. एकूणच राजकीय वातावरणावरून सध्या भाजपवासी झालेल्या प्रा. ढोबळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी तर सुरू केली नाही ना, असा या वक्‍तव्यातून सूर निघू लागला आहे.

नथीतून मारलेला तीर दाखवतोय लोकसभेचा रस्ता !
आबासाहेबांनंतर शेकापला एकसंघ ठेवण्यासाठी नेतृत्वाचा लागणार कस !

शिंदे पिता-पुत्रीवरील शरसंधानाशिवाय या मतदारसंघात तसेच राज्याच्या राजकारणात नोंद घेतली जात नाही, हे ते जाणून आहेत. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या राजकारणातील "टीआरपी' वाढविण्यास उपयुक्त असल्याने प्रा. ढोबळे यांनी सोलापुरातील कार्यक्रमात हावभाव करीत टीका केली. अक्कलकोटचे कॉंग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पराभवास श्री. शिंदे हेच जबाबदार असल्याचे ठासून सांगत त्यांनी मोठा बारच फोडला. त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले. खरं तर 2009 च्या निवडणुकीचा हा दाखला असावा. तेव्हा शेगाव (ता. अक्कलकोट) येथे झालेल्या गोळीबारातून एका कार्यकर्त्याचा खून झाल्याच्या प्रकरणातून श्री. म्हेत्रे अडचणीत आले होते. ऐन प्रचारातून त्यांना दूर राहावे लागले होते. श्री. शिंदे यांनी त्यांच्या प्रचारासाठी अक्कलकोटला जाणे टाळले होते. त्याचा संदर्भ असण्याची शक्‍यता वाटते. 2019 च्या निवडणुकीत वातावरणच वेगळे होते. "मी पुन्हा येईन'च्या घोषणेने अन्‌ श्री. म्हेत्रे यांनी केलेल्या भाजपच्या जवळिकतेमुळे त्यांना पराभवाचे चटके सहन करावे लागले. श्री. म्हेत्रे हे नकारात्मक मानसिकतेतून लढल्याचे जाणवले. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनी तीनवेळा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली. मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांचे नाव आघाडीवर असतानाच श्री. शिंदे यांनी इंदापुरातील कार्यक्रमात पक्षात आपल्या शब्दाला किंमतच राहिली नसल्याचे सांगितल्याने त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात वावटळच उठले. प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिपदाबाबतच्या शब्दासंदर्भात हे वक्तव्य नसावे, असाही सूर निघू लागला आहे. श्री. शिंदे यांना दोनवेळा पराभव स्वीकारावा लागल्याने व वाढत्या वयामुळे राजकारणातून त्यांची "एक्‍झिट' गृहीत धरली जात आहे. तीनवेळा निवडून येऊनही राज्यात फारसे काही हाती लागत नसल्याने प्रणिती शिंदे यांनी आता लोकसभेच्या दृष्टीने तयारी करण्यास सुरवात केल्याचे त्यांच्या एकूणच हालचालींवरून दिसू लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीची तयारीही असू शकते. शहर उत्तर, सोलापूर दक्षिण मतदारसंघात त्यांनी लक्ष घातले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात त्यांनी हजेरी लावली होती. अधून-मधून मोहोळकरांशीही त्यांचा संपर्क असतो.

कोणाचा होणार विचार?

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामींच्या जातीच्या दाखल्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्याचा काही निकाल लागला तर तयारी हवी. तसेच पुढील लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची चर्चा असते. डॉ. महास्वामींच्या भवितव्याविषयी भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असल्याने तसेच भविष्यात लोकसभेला कॉंग्रेसकडून प्रणिती शिंदे जर उमेदवार राहिल्या तर भाजपकडून उमेदवारीसाठी प्रा. ढोबळे किंवा त्यांची मुलगी कोमल यांचा विचार होऊ शकतो. यासाठी आतापासूनच प्रा. ढोबळे यांनी रणशिंग फुंकलेले दिसत आहे. प्रा. ढोबळे यांचे प्रयत्न असले तरी भाजपच्या धक्कातंत्राने कोऱ्या पाटीचा चेहरा येण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.