पंढरपूर (सोलापूर) : राज्यात कोरोनाची (Covid-19) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ती हाताळण्यामध्ये शासन आणि प्रशासन (Governance and administration) कमी पडत आहे. कोरोना काळात प्रशासनामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे, असा गंभीर आरोप करत शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत (Former Minister MLA Tanaji Sawant) यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. (Former minister Tanaji Sawant accused Corona of not showing seriousness in work)
आमदार तानाजी सावंत यांनी बुधवारी येथील शासकीय विश्राम गृहावर पंढरपूर विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर माजी मंत्री सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना थेट कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रशासनातील अधिकारीच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.
या वेळी श्री. सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थितीवर अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवले आहे. परंतु, प्रशासनातील तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक हे गाव पातळीपर्यंत पोचत नाहीत. फक्त कागदी घोडे नाचवून सरकारची दिशाभूल करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली "ब्रेक द चेन' ही मोहीम देखील प्रशासनातील अधिकारी मोडीत काढत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोना वाढला आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये राज्यातील प्रशासन कमी पडत असून सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही आमदार सावंत यांनी केला. शिवसेनेने गरीब व गरजू लोकांसाठी कोव्हिड सेंटर्स सुरू केली आहेत. सोलापूर जिल्ह्यात देखील असे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचेही आमदार सावंत यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांची नुकतीच सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर ते बुधवारी प्रथमच सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी पहिल्याच दिवशी त्यांनी पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस या भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचनाही दिल्या.
या वेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, गणेश वानकर, तालुका प्रमुख महावीर देशमुख, सुधीर अभंगराव, संजय घोडके, संदीप केंदळे, सिद्धेश्वर कोरे, लंकेश बुरांडे आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.