दर वर्षी उन्हाळी तीन चार महिन्यांचा व वर्षभराच्या उन्हाचा विचार केल्यास 14.68 टिएमसी पाण्याचे तर बाष्फीभवन म्हणजे वाफ होते आहे. तर उजनीवरुन पिण्यासाठी 2.49 टिएमसी पाण्याचा वापर होतो.
करमाळा (सोलापूर) : उजनी धरणावरील (Ujani Dam) पाणी (Water) वापराचा तपशील पाहिल्यास उजनीतून आता नवीन प्रस्तावांना मंजुरी देऊन पाणी देणे ही बाब करमाळा तालुक्यासह सोलापुर जिल्ह्यावर अन्याय करणारी आहे. नियोजित इंदापूर उपसा सिंचन योजनेचा (indapur upsa irrigation scheme) आदेश निर्णय तातडीने रद्द करा, अन्यथा मराठवाड्यासाठी उजनीतून सुरु असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील (Former MLA narayan patil) यांनी दिला आहे. (Former MLA narayan patil said that the order of indapur upsa irrigation scheme should be canceled immediately)
उजनीतील उपलब्ध पाणी व प्रत्यक्ष मंजूर योजनेचे एकूण पाणी याचा विचार केला असता आता उजनीतून एक थेंबही पाणी इतरत्र देण्यासारखी परिस्थिती नाही. महामंडळाच्या आकडेवारी (टिएमसी) नुसार भीमा प्रकल्प प्रवाही क्षेत्र ( 34.51), खाजगी उपसा क्षेत्र (7.63), सीना-माढा उपसा (4.75), भीमा-सीना जोडकालवा (3.15), दहिगाव उपसा (1.81), शिरापुर उपसा (1.73), आष्टी उपसा (1), बार्शी उपसा (2.59), एकरुख उपसा (3.16), सांगोला उपसा (2), लाकडी-निंबोडी प्रस्तावित (0.57), मंगळवेढा उपसा (1.01), कृष्णा-मराठवाडा (17.98), आष्टी (बीड साठी राखीव 5.68) असे पाणी वाटप नियोजन असून यातील मराठवाड्यासाठी काम सुरु आहे तर बीड जिल्ह्यातील आष्टीसाठी पाणी मंजुरी आहे.
दर वर्षी उन्हाळी तीन चार महिन्यांचा व वर्षभराच्या उन्हाचा विचार केल्यास 14.68 टिएमसी पाण्याचे तर बाष्फीभवन म्हणजे वाफ होते आहे. तर उजनीवरुन पिण्यासाठी 2.49 टिएमसी पाण्याचा वापर होतो. तसेच औद्योगिक साठी 3.26 टिएमसी पाणी वापरले जाते. धरणाचा एकूण पाणीसाठा 117 टिएमसी असून गाळ मोठ्या प्रमाणावर आहे. मृतसाठा हा 63.66 टिएमसी इतका आहे. एकूण पाणी नियोजन 84.30 टिएमसी आणि प्रत्यक्ष गाळ आणि मृतसाठा आणि बाष्पीभवन याचा विचार केल्यास पाणी वापर व मंजुरी याचा ताळमेळ कुठेच बसत नसून आता नवीन प्रकल्पाना मंजुरी देणे म्हणजे मुळ नियोजन विस्कळीत करुन विद्यमान योजनांवर गंभीर परिणाम करणारे आहे.
यामुळे शासनाने अधिकारी व प्रत्यक्ष शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांच्यासह कार्यस्थळावर येऊन पाहणी करावी. गणिती आकडेमोडीत पाणी शिल्लक दाखवून सांडपाणी हा शब्दप्रयोग करुन सर्वांची दिशाभुल करु नये. अन्यथा मराठवाड्याला पाणी जाणार नाही. शेतकऱ्यांमध्ये पाटबंधारे विभागाने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याबाबत प्रचंड रोष असून या रोषाचे आंदोलनात रुपांतर होऊन कृष्णा-मराठवाडा बोगद्याचे काम बंद पडेल, असा इशाराही माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.
कृष्णा-मराठवाडा योजनेसाठी 17.98 टिएमसी पाणी मंजूर असून बोगद्याचे काम सुरु आहे. ही योजना मंजूर करत असताना कृष्णेतून नीरेत व नीरेतून भीमा नदीत पाणी सोडून मराठवाड्यास पाणी नेले जाईल असे सांगितले जात होते. कुठे आहे कृष्णेचे पाणी भीमेत? उलट उजनीच्या मृतसाठ्यातुनच हे पाणी जाणार आहे. सुरवातीस फक्त 7 टिएमसी पाणी मंजूर करणार असे सांगून आता 17.98 टिएमसी पाणी मंजूर करुन घेतले. अरे! कितीवेळा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फसवणार? आता मात्र मराठवाड्यासच काय पण भविष्यात बेकायदेशीर व मुळ पाणीवाटपात नसलेला एक थेंबही उजनीतुन उचलू देणार नाही. लवकरच मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना इंदापूरबाबतचा आदेश रद्द करण्याची विनंती करणार आहे.
- नारायण पाटील, माजी आमदार
(Former MLA narayan patil said that the order of indapur upsa irrigation scheme should be canceled immediately)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.