Solapur : '..तर मुख्यमंत्र्यांची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही'; शिंदेंना कोणी दिला इशारा

सरकारी धोरणामुळे एवढ्या लोकांचा रोजगार बुडवण्यास सरकार निघाले आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeEsakal
Updated on
Summary

राज्य सरकारच्या विचाराधीन असलेला प्रस्ताव सर्वसामान्य कामगारांचा आणि छोट्या-मोठ्या उद्योजकांचा रोजगार हिरावून घेणारा आहे.

सोलापूर : राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यभर एक समान, समानरंगी गणवेश खरेदी करून वितरित करण्याचा विचार करत असल्याने गणवेश शिलाई कामगार, कारखानदार यांच्यावर बेकारीचे संकट ओढवले आहे. या विरोधात मुख्यमंत्र्यांची गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam Master) यांनी दिला आहे.

हुतात्मा रेडिमेड शिलाई कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने काल लाल बावटा कार्यालयात रेडिमेड शिलाई कामगारांचा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वीरेंद्र पद्मा अध्यक्षस्थानी तर व्यासपीठावर सिटू राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख, अँड.अनिल वासम, संदीप रेउरे, बाळकृष्ण मल्याळ उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, शाळा स्तरावर करण्यात येणारी गणवेश खरेदी राज्य सरकार स्वतःच्या हाती घेण्याचा विचार करीत आहे. वस्तूंच्या खरेदी वाटपातील विकेकेंद्रीकरणा ऐवजी केंद्रीकरणाकडे कल दिसतो. दरवर्षी स्थानिक पातळीवर शालेय व्यवस्थापन समिती मार्फत शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्या पसंतीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नेमक्या मापाचे गणवेश शिवून घेते.

CM Eknath Shinde
Karnataka Election : गैरसमजुतीतून ग्रामस्थांनी केली मतदान यंत्रांची तोडफोड; अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की

पालकांना परवडणाऱ्या दरात हे कपडे तयार करुन घेतले जातात. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास घरगुती छोटे-मोठे १ हजार कारखानदार व जेमतेम ३० हजार कामगारांची उपजीविका या गणवेश शिलाईवर अवलंबून आहे अशी माहिती त्यांनी यावेळी सांगितली. विविध महिला बचतगटामार्फत देखील शिलाई काम होते. त्यामध्ये १० हजार महिला सहभागी होतात. सरकारी धोरणामुळे एवढ्या लोकांचा रोजगार बुडवण्यास सरकार निघाले आहे.

CM Eknath Shinde
Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस युती होणार? युतीबाबत डीकेंचं मोठं वक्तव्य

राज्य सरकारच्या विचाराधीन असलेला प्रस्ताव सर्वसामान्य कामगारांचा आणि छोट्या-मोठ्या उद्योजकांचा रोजगार हिरावून घेणारा आहे. या पूर्वी एकदा हा निर्णय झाला तेव्हा त्यात प्रचंड गोंधळ झाला होता. त्यामुळे पूर्वीची स्थिती कायम ठेवावी या मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असेही शेवटी त्यांनी सांगितले. आभार ॲड.अनिल वासम यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()