Solapur News : जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या सोबत जाणार; माजी आमदार रमेश कदम यांचा गौप्यस्फोट

तब्बल आठ वर्षा नंतर माजी आमदार कदम यांना जामीन मिळाला
former mla  ramesh kadam blast i will  join who solve basic problems of people politics solapur
former mla ramesh kadam blast i will join who solve basic problems of people politics solapurSakal
Updated on

मोहोळ : माझ्या आमदारकीच्या कार्यकाळातील मोहोळ विधानसभेला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था आहे तशीच आहे, आरोग्य, पाण्याचा प्रश्नही तसाच आहे, असे अनेक नागरिकांनी मला सांगितले. त्यावर तरुणांना बरोबर घेऊन काम करणार आहे. शहराला "स्मार्ट सिटी" बनविण्या बरोबरच आयटी पार्क ची संकल्पना राबविणार असून "घंटो का काम मिंटो मे" ही संकल्पना राबविणार आहे.

जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या बरोबर आपण जाणार असल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार रमेश कदम यांनी केला. तब्बल आठ वर्षा नंतर माजी आमदार कदम यांना जामीन मिळाला. कारागृहात असताना त्यांनी 2019 ची निवड विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 25 हजार मते पडली होती.

ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी सहा दिवस मोहोळ विधानसभा मतदार संघाचा गाव भेट दौरा केला, त्यावेळी सहा दिवसातील अनुभवाचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते.

former mla  ramesh kadam blast i will  join who solve basic problems of people politics solapur
Solapur : दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू- आमदार संजय शिंदे

मोहोळ तालुक्यात राजकीय गट आहेत, सहा दिवसाच्या गावभेट दौऱ्यात माझ्या पासून पुढारी मंडळी अंतर राखून होते, मात्र सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर होती याची जाणीव मला झाली. मात्र नेते म्हणविणाऱ्यांनी साहेब आम्ही तुमच्या बरोबरच आहोत असे खाजगीत येऊन सांगत होते.

आमदार यशवंत माने यांनी मतदार संघाच्या विकासासाठी बाराशे कोटीचा निधी आणला याबाबत त्यांना विचारले असता, गाव भेट दौऱ्या निमित्त अनेक नागरिकांनी आपल्याकडे ठराविक भागाचा विकास झाल्याचे सांगितले. आमदार माने यांच्या कामाबद्दल माझी तक्रार नाही, परंतु विकास चौफेर झाला पाहिजे.

ज्या ठिकाणी विकास झाला नाही त्या ठिकाणचा बॅकलॉग भरून काढणे गरजेचे असल्याचे माजी आमदार कदम यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

former mla  ramesh kadam blast i will  join who solve basic problems of people politics solapur
Solapur : अवजड वाहतुकीमुळे आपघातात महिलेचा जागीच मृत्यू ; नागरिक संतप्त, प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरोधात रास्ता रोको

राजकीय निर्णया बाबत त्यांना विचारले असता लवकरच एक कार्यकर्ता मेळावा आयोजीत करून त्यात जनता जो निर्णय देईल तो सिरसावंद्य असेल असे सांगत, मोहोळ मतदार संघ जसा चांगला आहे तसा खूप डेंजर ही असल्याचे माजी आमदार कदम यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या बाबत त्यांना विचारले असता, त्यांनी इतक्या दिवस मतदार संघ सांभाळला परंतु निवडणुकी दरम्यान व नंतरही त्यांनी दारू, पार्टी, असले घाणेरडे राजकारण केले नाही, त्याबाबत त्यांना मानावेच लागेल असे ही माजी आमदार कदम यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल सरवदे, शशी कसबे, जयपाल पवार, सुधीर खंदारे, सचिन भिसे, आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.