Loksabha Election 2024 : मतदार संघातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणाऱ्या बरोबर मी जाणार ; माजी आमदार रमेश कदम

जो मोहोळ विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करेल त्याच्या सोबत आपण जाणार आहोत.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

मोहोळ : जो मोहोळ विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करेल त्याच्या सोबत आपण जाणार आहोत. मात्र हा निर्णय मी आमदार असताना आठ महिन्यात मोहोळ विधानसभा मतदार संघात काम केलेल्या व मला पोहोच पावती दिलेल्या मतदारांना विचारूनच घेणार असल्याचे प्रतिपादन मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी केले.

सध्या जाहीर झालेल्या लोकसभा व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार कदम यांनी बुधवार ता 28 पासून मोहोळ विधानसभा मतदार संघात "स्नेह मेळाव्यास" आरंभ केला आहे, गुरुवारी आष्टी जिल्हा परिषद गटातील मतदारांशी ते विचार विनिमय करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी आष्टीचे सरपंच डॉ अमित व्यवहारे होते.

Loksabha Election 2024
Amravati Loksabha: नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी, बच्चू कडूंचा कडाडून विरोध

माजी आमदार कदम म्हणाले, माझ्या कार्य कालात आष्टी उपसा सिंचन योजनेचे काम बऱ्यापैकी मार्गी लागले. मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता ही योजना कायमस्वरूपी राबवली त्यामुळे अनेकांना पिण्याचे पाणी आजही उपलब्ध आहे. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही माझी रणनीती असणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.

यावेळी सरपंच अमित व्यवहारे म्हणाले, मोहोळ तालुक्याला काम करणाऱ्या आमदाराची गरज आहे. आठ महिन्यात माजी आमदार कदम यांनी विकास कामाची जी चुनुक दाखवली त्यावर सर्व सामान्य जनता समाधानी आहे. तुम्ही विचार विनिमय करून कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घ्या, वेळ प्रसंगी अपक्ष म्हणून मोहोळ विधानसभा लढवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. यावेळी आष्टी जिल्हा परिषद गट व गणातील जेष्ठ नागरिक, युवक, महिलावर्ग मोठया संखेने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.