सांगोला : विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत नरेटीव्ह सेट केल्याने लोकसभेत पराभव झाला. कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोचण्यासाठी काम करावे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे संघटन वाढविण्यासाठी जोमाने तयारीला लागावे, असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केले.