Solapur Crime : सोलापुरात चोरीप्रकरणी चार जणांना अटक

सोलापुरात ७३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; दोन गुन्हे उघडकीस
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : शहर गुन्हे शाखेने चोरी व जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. श्रीकांत दयानंद केंची (वय २५, रा. ए ग्रुप, प्रभु कटपिस सेंटरजवळ, जुना विडी घरकुल, सध्या रा. एच. ग्रुप, जुना विडी घरकुल, सोलापूर), राकेश झिपरे (रा. जोडभावी पेठ, सोलापूर), वैभव भागानगरे (रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर), अनिल हुच्चे (रा. मित्रनगर, शेळगी, सोलापूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीनाथ महाडीक यांना एक संशयित मुळेगाव रस्त्यावरील केकडेनगर रस्त्यावर चोरीतील सोने विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार तेथे जाऊन श्रीकांत यास ताब्यात घेतले.

त्याच्या अंगझडतीत ६७ हजार ५०० रुपयांचे २२.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण मिळाले. चौकशीत त्याने दोन-तीन महिन्यांपूर्वी जुना विडी घरकुलमधील दासरी शाळेजवळ पायी निघालेल्या एका महिलेचे जबरदस्तीने गंठण चोरून नेल्याचे सांगितले. त्यानुसार गुन्ह्यांची माहिती तपासल्यावर अंबिका रवींद्र आबात्तीनी (सी ग्रुप, सागर चौक, जुना विडी घरकुल) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होता.

पवन रामेश्वर करवा (रा. यशोधन, पंधे अपार्टमेंट, सम्राटचौक, सोलापूर) यांच्या दुकानातील पशुखाद्य दुकानातून पाच हजार ७०० रुपयांच्या सात पोती पशुखाद्याची चोरी झाली होती. त्याच्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून राकेश, वैभव व अनिल यास अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महाडीक, हवालदार अंकुश भोसले, अविनाश पाटील, नाईक शैलेश बुगड, प्रकाश गायकवाड, कॉन्स्टेबल राजकुमार वाघमारे, अभिजित धायगुडे, सतीश काटे, वसीम शेख यांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.