मित्राकडून 19 कोटींची फसवणूक ! बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट

मित्राकडून 19 कोटींची फसवणूक ! बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट
बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट
बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅटCanva
Updated on
Summary

नाशिक येथील सराफ व्यापारी प्रशांत गुरव यांना त्यांच्या ओळखीतील मित्राने तब्बल 19 कोटी सात लाख 78 हजार 570 रुपयांची फसवणूक केली.

सोलापूर : नाशिक (Nashik) येथील सराफ व्यापारी प्रशांत गुरव यांना त्यांच्या ओळखीतील मित्राने तब्बल 19 कोटी सात लाख 78 हजार 570 रुपयाला फसविल्याचा गुन्हा बुधवारी (ता. 4) रात्री उशिरा विजापूर नाका पोलिसांत (Vijapur Naka Police Station, Solapur) दाखल झाला. मजरेवाडी परिसरातील जागेचा विकास करून त्या ठिकाणी इमारत बांधून फ्लॅट विक्रीतून मोठी रक्‍कम मिळेल, असे आमिष देऊन अमोल यादव (रा. जुळे सोलापूर) याने फसवणूक केल्याची फिर्याद प्रशांत गुरव यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट
जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्‍यांमध्ये कडक लॉकडाउन? शुक्रवारी निर्णय

सराफ व्यावसायिक गुरव यांच्याशी अमोल यादव याने घरोबा निर्माण केला. सोलापूर शहरातील जागेचा विकास करून त्यातून मोठी रक्‍कम मिळेल, असा विश्‍वास त्यांना दिला. मजेरवाडी परिसरातील दिलीप सचदेव व स्वामी या व्यक्‍तींची जागा घेऊन त्या ठिकाणी विकास करण्याचे अमोलने त्यांना सांगितले. त्यासाठी त्याने गुरव यांच्याकडून 2013 ते 2019 या कालावधीत वेळोवेळी 19 कोटी सात लाख 78 हजार 570 रुपये घेतले. इमारत पूर्ण झाल्यानंतर अमोलने माझी बनावट स्वाक्षरी करून बोगस कागदपत्रे तयार करून परस्पर फ्लॅट विकले. तत्पूर्वी, माझी पत्नी त्याला बॉम्बे पार्क येथे पैसे मागायला गेल्यानंतर त्याने पत्नीचा हात धरून तिला लज्जा वाटेल असे वर्तन केले. पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली, असेही फिर्यादीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

"क्राईम ब्रॅंच'कडे सोपविला तपास

नाशिक येथील सराफ व्यापाऱ्याला त्याच्या ओळखीच्या मित्राने (अमोल यादव) तब्बल 19 कोटी रुपयांना फसविले. फिर्यादी प्रशांत गुरव यांनी प्रथमत: पोलिस आयुक्‍तांची भेट घेऊन सविस्तर माहिती त्यांच्यासमोर कथन केली. त्यानंतर गुरव यांनी अमोल यादवविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, फसवणुकीची रक्‍कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

बनावट स्वाक्षरीने विकले फ्लॅट
सांगलीचा नवरा अन्‌ कोल्हापूरची नवरी; धाक मात्र सोलापूरच्या जातपंचायतीचा!

पोलिस कर्मचाऱ्यांनीच वाचला तक्रारींचा पाडा

विजापूर नाका पोलिस ठाण्याला आर्थिक फसवणुकीच्या दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी वारंवार कॉल केले. मात्र, एका कर्मचाऱ्याने सांगितले, सहा पानांची फिर्याद असून सर्व कागदपत्रे गुन्हे शाखेचा कर्मचारी घेऊन गेला असून तिकडे कॉल करा. तर दुसरा कर्मचारी म्हणाला, कच्च्या फिर्यादी कॉपीवरून सीसीटीएनएसवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून ते काम संपायला पहाट होईल. हत्तुरे वस्ती परिसरातील तक्रारीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरा कर्मचारी म्हणाला, दिवसभर ढीगभर गुन्हे दाखल होतात, त्याची नोंद सीसीटीएनएसवर करण्यासाठी एकच संगणक आहे. शेवटी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी कॉल करून सांगितल्यानंतर तेथील कर्मचाऱ्याने गुन्ह्याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.