Ganesh festival : गणेशोत्सवातील तरुणाईला दातृत्वाच्या अभिनव संकल्पनेतून वेगळी दिशा

अवयवदान व देहांगदान चळवळीतून सोलापुरात पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. या चळवळीसाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद अन् अनुकरणीय आहे
solapur
solapur sakal
Updated on

रक्तदानाच्या चळवळीत सोलापूर संपूर्ण देशात अग्रेसर आहे. शतकवीर रक्तदात्यांची संख्या ४५, दीडशेहून अधिकवेळा रक्तदत्यांची संख्या नऊ तर तब्बल दोनशेपेक्षा जास्तवेळा रक्तदान केलेल्यांमध्येही सोलापूर अव्वल असल्याचा अभिमान वाटतो. मंगळवारपासून (ता. १९) अत्यंत उत्साहात सुरु होणाऱ्या गणेशोत्सवातील तरुणाईला वेगळी दिशा देण्याच्या उद्देशाने देह, अवयव व नेत्रदानाचा संकल्प करुन या मोहिमेला चळवळीचे रुप देण्याची भूमिका आहे.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा सोलापुरातून घेतली. त्यातून स्वातंत्र्याची चळवळ उभारल्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्य तर मिळाले, पण गणेशोत्सवाचे रुप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. काही मंडळांकडून आदर्श घ्यावा, असे समाजोपयोगी कार्य होत असल्याचा सार्थ अभिमान आहे. प्रदूषणमुक्त, पर्यावरणयुक्त व डीजेविरहीत गणेशोत्सवाची संकल्पना मांडताच सोलापुरातील सार्वजनिक मध्यवर्ती मंडळांनी या योजनेसाठी सहकार्याचा हात पुढे केला.

यातील काही मंडळांनी डीजेबंदीवरच आपला भर असल्याचे ठासून सांगितले. पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन तसेच स्थानिकांना रोजगाराची संकल्पनाही ‘सकाळ'मध्ये झालेल्या चर्चेवेळी पुढे आली. समाजोपयोगी उपक्रमांबरोबरच मंडळातील कार्यकर्ते व त्यांच्या नातेवाईकांमध्ये देह, अवयव व नेत्रदानाच्या चळवळीला गती देण्यासाठी प्रबोधनाची मोहीम आखण्यात आली.

अवयवदान व देहांगदान चळवळीतून सोलापुरात पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. या चळवळीसाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद अन् अनुकरणीय आहे. ही चळवळ फक्त काही ज्येष्ठांचीच आहे, असा गैरसमज होऊ लागल्याने ‘सकाऴ़'ने पुढाकार घेत गणेशोत्यवात एकत्र येणाऱ्या तरुणाईला आवाहन केले आहे. या बैठकीत या दानाबाबत असलेल्या गैरसमजाबाबत तसेच ही चळवळ वाढीस लागण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविण्याबाबतची भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले

पूर्वी सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी शव आयात करावा लागत होता. अलिकडील काळात झालेल्या प्रबोधनातून सोलापुरातून शव निर्यात होऊ लागले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थी संख्याही वाढल्याने अभ्यासासाठी मृतदेहाची गरज वाढते आहे. तसेच अन्य वैद्यकीय महाविद्यालयांनाही पाठवण्यासाठी देहदानाची गरज भासते. सोलापूर शहराप्रमाणे जिल्हाभर या चळवळीचा प्रसार होण्याची गरज आहे. अलिकडील काळात अवयवदानाचेही महत्त्व अधोरेखीत झाले आहे.

भारतात दृष्टीहिनांची संख्या मोठी असून एका व्यक्तीच्या नेत्रदानातून सहाजणांना दृष्टी मिळत असल्याने नवे तंत्र विकसीत झाले आहे. पूर्वी दोन डोळ्यांचा लाभ फक्त दोघांना होत होता. पण आता कॉर्नियाचे थर वेगळे करून एका डोळ्यामुळे तिघांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. मरणोत्तर नेत्रदानाबद्दल सर्वाधिक जागरुकता आहे पण त्यासोबत गरजू दृष्टीहिनांची संख्यादेखील फार मोठी आहे.

देहदान

मृत्यूनंतर वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी देहदानाचा उपयोग

देहदानासाठी इच्छापत्र भरुन देता येते

देहदान हे मृत्यूनंतर चार तासात करावे लागते

इच्छापत्र नसले तरी नातेवाईक देहदान करू शकतात

अवयवदान

ब्रेनडेड स्थितीत फक्त अवयवदान करता येते

ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करता येते

प्रत्येक अवयवाचा प्रत्यारोपण करण्याचा कालावधी वेगवेगळा

किडणी, नेत्रपटल व यकृत प्रत्यारोपणाचे प्रमाण सर्वात जास्त

मरणोत्तर नेत्रदान

मृत्यू झाल्यानंतर दात्याच्या डोक्याखाली उशी देऊन डोळे बंद करावेत

खोलीतील पंखा बंद करावा किंवा एसी असेल तर तो चालू करावा

डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी

नजिकच्या नेत्रपेढीला एका फोन कॉलवर नेत्रपटल दानाची प्रक्रिया लगेच होऊ शकते

नेत्रपटल दान केवळ सहा मिनिटात होऊ शकते

नेत्रपेढीत नेत्र पटल सुरक्षीत जमा करता येतात

प्रतीक्षा यादीनुसार गरजू दृष्टीहिनांना होते नेत्रदान

दरवर्षी सरासरी होणारे दान

अवयवदान - २

नेत्रदान - १२५

देहदान -२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.