- रामेश्वर विभूते
सोलापूर - गणेशोत्सव म्हणजे सर्वांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा सण. श्रावण महिना जसा सुरु होतो, तसे विविध सणांचा काळ येतो. म्हणूनच श्रावणाला सणांचा उत्सव आणणारा महिना श्रावणराज म्हणून संबोधले जाते. गणेशोत्सव आला की उत्साहाला उधाण.. ढोल-ताशांचे आवाज... गल्लीतल्या चौकात घुमू लागले की टीव्ही, मोबाईल सोडून चौक गाठतात. लेझीमच्या पैतऱ्यांचा ठेका म्होरक्याच्या हाताच्या अन् इशाऱ्यावर डाव बदलतात. नवीन पिढीतल्या लहान मुलांचा लेझीमचा डाव बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते.