केत्तूर: कोरोनाचं विघ्न दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याला साकडं; गणरायाला निरोप

Ganpati visarjan
Ganpati visarjansakal media
Updated on

केत्तूर : दहा दिवसांच्या आनंदी, चैतन्यमयी अन् जल्लोषपूर्ण गणेशोत्सवानंतर (Ganpati festival) " गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या " च्या जयघोषात गणपती बाप्पांना निरोप (Ganpati visarjan) देण्यात आला. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे (corona pandemic) सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमाण अत्यल्प असले तरी घरगुती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळीही कोणताही थाटमाट, मिरवणूका, ढोल बाजा, आतषबाजी न करता (No celebrations) अत्यंत साधेपणाने करण्यात आले. यावेळी कोरोनाचे संकट पूर्णपणे संपू दे ! अशी आर्त हाक घालत मूर्तीचे उजनी जलाशयाच्या विस्तीर्ण पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले.जड अंतःकरणाने गणेशभक्तांनी (Ganesha devotees) यावेळी गणरायाला निरोप दिला.

Ganpati visarjan
पुणे : सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुकीविना गणेशविसर्जन

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचे संकट डोक्यावर असले तरीही गणेशभक्तांचा उत्साह मात्र दरवर्षीसारखाच होता. मोरया,मोरया गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात पंचक्रोशीतील गणेशभक्तांनी आपापल्या गाडी, दुचाकीवर तर काही जण स्वतः हातात,डोक्यावर गणेशमूर्ती घेत 82 % पाणीसाठा झालेल्या उजनी जलाशयाकडे मार्गस्थ होत होते.शासनाच्या नियमानुसार अतिशय साध्या पद्धतीने व तेवढ्यात शांततेत विसर्जन पार पडले. सर्वच गणेशभक्तांनी शासनाच्या आदेशाचे पालन केल्याचे यावेळी दिसून आले.सोशल मीडिया मात्र सकाळपासूनच गणेश विसर्जनामुळे गणेशभक्त भावुक झाला होता. श्री गणेश विसर्जनानंतर नवरात्रोत्सवाचे वेध मात्र सर्वांना लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.