जनकल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाई गणपतराव आबा

जनकल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाई गणपतराव आबा
जनकल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाई गणपतराव आबा
जनकल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाई गणपतराव आबाCanva
Updated on
Summary

कायम विरोधी बाकावर बसणाऱ्या व शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाई देशमुख यांना दोनवेळा मंत्रिपदाची संधी मिळाली.

सोलापूर : "माझं मंत्रिपद गेलंय... मला इथंच सोडा' असं अत्यंत विनम्रपणे सांगत लालदिव्याच्या गाडीला वाटेतच सोडून एसटीतून गावी परतणारे... बनावट स्वातंत्र्य सैनिक असल्याबद्दल विधीमंडळात आवाज उठवल्यानंतर पुन्हा त्या ज्येष्ठ नेत्याचे स्वातंत्र्य सैनिक असल्याबद्दलचा पुरावा मिळाल्यानंतर मनाचा मोठेपणा दाखवत माफी मागणारे सहृदयी, विनम्रशील स्वभावाचे, तत्वनिष्ठ, जनकल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाई गणपतराव आबा (Ganpatrao Deshmukh) म्हणजे साधं सरळ व्यक्तिमत्त्व ! (Ganpatrao Deshmukh, who made life meaningful for the welfare of the people-ssd73)

जनकल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाई गणपतराव आबा
आबांना मिळत होती सर्वाधिक पेन्शन! छदामही खर्चला नाही स्वत:साठी

कायम विरोधी बाकावर बसणाऱ्या व शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाई देशमुख यांना दोनवेळा मंत्रिपदाची संधी मिळाली. पुलोदमध्ये सत्तेत सहभागी असताना त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा कधीही त्यांनी उन्माद केला नाही. मोहोळ तालुक्‍यात एका गावात कार्यक्रमात असतानाच त्यांना सरकार गडगडले असे समजले. तेव्हा आबांनी लालदिव्याच्या गाडीच्या चालकाला अत्यंत नम्रपणे सांगितले, की आता या क्षणापासून मी मंत्री नाही. तुम्ही ही गाडी जमा करा. मी एसटीने गावी जातो. चालकाला प्रचंड आश्‍चर्याचाच धक्का बसला. इतक्‍या साध्या सरळ स्वभावाचा नेताच त्यांनी पाहिलेला नव्हता. बनावट स्वातंत्र्य सैनिक असल्याबाबत एका ज्येष्ठ मंत्र्याविरोधात आबासाहेबांनी एकदा प्रचंड गोंधळ घातला होता. नंतर पुरावा दाखवल्यानंतर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत जाहीर माफीही मागितली. इतका सहृदयी व दिलदार मनाचा हा नेता होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला स्वतंत्र गाडी करून आबासाहेब कधीही गेले नाहीत. एसटीने नागपूर गाठणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी असावेत.

जनकल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाई गणपतराव आबा
'आबासाहेब अमर रहे'च्या घोषणांनी आबांना अखेरचा लाल सलाम

एकाच मतदारसंघातून एकाच पक्षाकडून निवडून येणारे आबासाहेब अकरावेळा आमदार होते. अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी आमदारकीचे पद असूनही कधीही बडेजाव केला नाही. आमदारकीचे अर्धशतक पूर्ण केल्याबद्दल सभागृहाने त्यांचा सन्मान केला होता. त्यांना अनेकवेळा हंगामी अध्यक्ष होण्याचाही मान मिळाला. शिक्षणाने वकील पण त्यांनी आयुष्यभर जनतेची वकिली करण्याचे व्रत पत्करले होते, ते त्यांनी निष्ठेने पार पाडले. आणीबाणीच्या काळात त्यांच्यावर तुरुंगवास भोगण्याची वेळ आली होती. 1977 मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेतेपदी काम केले. महाराष्ट्राचा आणि विधीमंडळाचा ते चालता- बोलता इतिहास होते.

जनकल्याणासाठी आयुष्य वेचणारे भाई गणपतराव आबा
सांगोल्याबरोबरच मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी झटणारा योद्धा

सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात त्यांनी डाळिंबाच्या उत्पादनातून कृषी क्रांती करण्याचे मोठे धाडस केले. दुष्काळी सांगोला तालुका अशी प्रतिमा असताना शिरभावीसह 81 गावांची पाणीपुरवठा योजना, महिलांची सूतगिरणी, औद्योगिक वसाहतीची निर्मिती, पाणी योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी सर्वसामान्यांसाठी जनसेवकाचेच काम केले. जिल्ह्यातील राजकारणातील नवोदितांचे ते मार्गदर्शक होते. ज्येष्ठ नेत्यांसमवेत काम करताना त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही संस्थेतील पान हलत नव्हते. अशा सत्शील व्यक्तिमत्वाच्या जाण्याने जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याची मोठी हानी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.