काटीच्या कुंभारवाड्यातील कला सातासमुद्रापार ! गौरी मुखवट्यांना ग्लोबल टच

काटीच्या कुंभारवाड्यातील कला सातासमुद्रापार ! गौरी मुखवट्यांना ग्लोबल टच
काटीच्या कुंभारवाड्यातील कला सातासमुद्रापार ! गौरी मुखवट्यांना ग्लोबल टच
काटीच्या कुंभारवाड्यातील कला सातासमुद्रापार ! गौरी मुखवट्यांना ग्लोबल टचCanva
Updated on
Summary

पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या तुळजापूर तालुक्‍यातील काटी गावच्या श्रीकांत कुंभार या कलाकाराने आकर्षक गौरी व देवीच्या मुखवट्यांना रंग भरत जान आणली आहे.

वडाळा (सोलापूर) : कुंभार समाज म्हटलं की परंपरागत मातीतून बनविलेल्या डेरा, घागर, चूल, गौरी - गणपती (Gouri-Ganpati) मूर्ती बनविणारा समाज. "कला हेच जीवन' मानून कार्यमग्न होऊन आपल्या कुंचल्यातून स्वतःच्या कुंभार कलेला कुंभारवाड्यातच (Kumbharwada) जखडून न ठेवता, आपली कला (Art) सातामुद्रापार पोचविणारा अवलिया कलाकार. पश्‍चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) व मराठवाड्याच्या (Marathwada) सीमेवर असणाऱ्या तुळजापूर (Tuljapur) तालुक्‍यातील काटी गावच्या श्रीकांत कुंभार (Shrikant Kumbhar) या कलाकाराने आकर्षक गौरी व देवीच्या मुखवट्यांना रंग भरत जान आणली आहे.

काटीच्या कुंभारवाड्यातील कला सातासमुद्रापार ! गौरी मुखवट्यांना ग्लोबल टच
महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक !

काटी या खेडेगावातील श्रीकांत यांनी गौरी मुखवट्यांना परंपरागत रटाळ रंगरंगोटी न करता यामध्ये अभ्यासपूर्ण सुधारणा केली. यामुळे विविध कलर शेड्‌स आणि हुबेहूब डोळे साकारले आहेत. तसेच गौरी व देवींच्या मुखवट्यांना आपल्या आवडीनुसार कर्णफुले, झुबे व नथ घालण्यासाठी सोयही केली आहे. सध्या श्रीकांत यांनी साकारलेल्या गौरी व देवींचे मुखवटे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व तामिळनाडू तसेच केरळ, राजस्थानसह अमेरिका, युरोप, कॅनडा, कुवेत या देशांतही मागणी आहे. तसेच सुस्थितीत पॅकिंग करून कुरिअरद्वारे आतापर्यंत 600 मुखवटे त्यांनी पाठविले आहेत. त्यांच्या या कलेचे देश - विदेशातून समाधानी भाविक भक्त ग्राहकांतून कौतुक होत आहे.

काटीच्या कुंभारवाड्यातील कला सातासमुद्रापार ! गौरी मुखवट्यांना ग्लोबल टच
श्रावण विशेष : शिखर शिंगणापूर म्हणजे चैत्र, श्रावण महिन्यातील पर्वणीच

श्रीकांत कुंभार यांनी आपल्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी, भाऊ व भावजय यांच्या साथीने परंपरागत कलेला आपल्या कुंचल्यातून ग्लोबल टच दिला आहे. सध्या अमेरिका, कॅनडा येथील शॉपमध्ये श्रीकांत यांनी बनविलेले मुखवटे विक्रीला ठेवले आहेत. भारतातून तिकडे स्थायिक झालेल्या कुटुंबीयांकडून या मुखवट्यांना मागणी असल्याचे श्रीकांत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

आम्ही देवीचे मुखवटे श्रीकांत यांच्याकडून घेतले आहेत. मुखवटे खूपच सुंदर, आकर्षक व सजीव असल्याचे भासतात. यामुळे आम्ही समाधानी आहोत.

- श्रीमती जया, मिस एशिया विजेती 2019, हैदराबाद

परंपरागत कुंभार कलेत अभ्यासपूर्ण माहिती घेऊन ग्राहकांना, भाविकांना हवे तसे दर्जेदार मूर्ती, मुखवटे निर्माण करुन दिले. यामुळे आमच्याकडे मागणी वाढत आहे.

- श्रीकांत कुंभार, काटी, ता . तुळजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.