GDC and A व CMH ची परीक्षा 23 ते 25 ऑक्‍टोबरदरम्यान

GDC and A व CMH ची परीक्षा 23 ते 25 ऑक्‍टोबरदरम्यान
 परीक्षा
परीक्षाsakal
Updated on
Summary

या परीक्षेसाठी सिद्धेश्वर प्रशाला हे एकमेव परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. या केंद्रावरून 476 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

सोलापूर : सहकार विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या जी. डी. सी. ऍण्ड ए. (GDC and A) व सी. एच. एम. (CHM) या परीक्षा 23 ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत सोलापुरातील (Solapur) सिद्धेश्वर प्रशाला या केंद्रावर घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी (District Deputy Registrar Kundan Bhole) दिली. या परीक्षेसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर प्रशाला हे एकमेव परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यात आले आहे. या केंद्रावरून 476 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

 परीक्षा
Bank of India मध्ये विविध पदांची भरती! दहावी ते पदवीधरांना संधी

असे राहणार परीक्षेचे वेळापत्रक

  • 23 ऑक्‍टोबरला सहकारी गृहनिर्माण विषयाचा पेपर सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे. त्याच दिवशी दुपारी दोन ते पाच या वेळेत जमाखर्च विषयाचा पेपर होणार आहे.

  • 24 ऑक्‍टोबरला सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत लेखापरीक्षण व त्याच दिवशी दुपारी दोन ते पाच या वेळेत सहकाराचा इतिहास तत्त्वे व व्यवस्थापन या विषयाचा पेपर होणार आहे.

  • 25 ऑक्‍टोबरला सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सहकार कायदा व इतर कायदे या विषयाचा पेपर होणार आहे. त्याच दिवशी दुपारी दोन ते पाच या वेळेत सहकारी बॅंक संस्था व इतर वित्तीय संस्था या विषयाचा पेपर होणार आहे.

 परीक्षा
दृष्टिहीन मोनिकाचे नेत्रदीपक यश! बॅंकेत लिपिक पदापर्यंत मारली मजल

16 ऑक्‍टोबरपासून ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणास्तव ऑनलाइन प्रवेश पत्र मिळू शकत नाही अशा परीक्षार्थींना (सहकार आयुक्तांच्या प्राप्त हजेरी पटामध्ये समावेश असलेले) परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येईल. अशा परीक्षार्थींनी स्वतःचे फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र) सोबत आणणे आवश्‍यक आहे, अशी माहितीही जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.