आनंदाची बातमी : 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाला मिळणार जीवदान,पावसाची जोरदार हजेरी

Solapur: पेरणी झालेल्या खरीप पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आनंदाची बातमी : 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाला मिळणार जीवदान,पावसाची जोरदार हजेरी
Solapur rain Sakal
Updated on

Sangola: सांगोला शहर व तालुक्यात रविवारी (ता. 7) रोजी सर्वच महसूल मंडळमध्ये कमी अधिक 16.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी पुन्हा दुसऱ्या दिवशीही अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील सुमारे 30 हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या खरीप पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले असल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात खरीप पिकाचे सरासरी 22 हजार 719 हेक्टर क्षेत्र आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे तालुक्यात 30 हजार 696 हेक्टर क्षेत्रावर 135.11 टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. या खरीप पिकामध्ये चालू वर्षी सर्वाधिक 17 हजार 347 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची 444.61 टक्के पेरणी झाली आहे. तालुक्यात खरिपाच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे. सध्या पेरणी होऊन पिकाची उगवणही चांगली झाली होती.

आनंदाची बातमी : 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाला मिळणार जीवदान,पावसाची जोरदार हजेरी
Solapur: सोलापूर विकास मंचाकडून पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

अनेक भागात पाऊस झाल्यानंतर लगेचच पेरलेल्या पिकांना पाण्याची गरज असल्यामुळे बागायत क्षेत्रावरील खरीप पिकांना गेल्या आठवड्यापासून पाणी देण्याचे कामकाजही सुरू होते. जिरायत भागातील पिकांना पावसाची अत्यंत गरज होती. काही पिके पावसाअभावी व सतत सुरू असणाऱ्या वाऱ्यामुळे मानाही टाकू लागले होते. परंतु रविवारी तालुक्यातील सर्वच महसूल मंडलमध्ये सरासरी 16.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यामध्ये संगेवाडी मंडलमध्ये सर्वाधिक 70.8 मिलिमीटर तर सर्वात कमी पाऊस सोनंद व कोळा मंडलमध्ये 0.3 मिलिमीटर झाला आहे. सोमवार दिवसभर तालुक्यातील अनेक भागात सूर्यदर्शन झाले नाही दिवसभर ढगाळ वातावरण होते तर शहर व तालुक्यातील त अधून मधून पाऊस सुरूच होता. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असल्याचे दिसून आले. हा पाऊस खरीप पिकांसाठी लाभदायक असला तरी सखल भागात पाणी साठल्यानंतर मक्यासारखे पीक पिवळे पडण्याचा धोका असणार आहे.

आनंदाची बातमी : 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाला मिळणार जीवदान,पावसाची जोरदार हजेरी
Solapur Crime News : धक्कादायक! दारूसाठी डोक्यात दगड घालून मित्राचा खून, आरोपी अटकेत

मंडलनिहाय रविवार झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

सांगोला - 8.8

शिवणे - 30.3

जवळा - 3.3

हातीद - 0.8

सोनंद - 0.3

महूद - 35.5

कोळा - 0.3

नाझरा - 1.5

संगेवाडी - 70.8

एकूण - 16.8

आनंदाची बातमी : 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाला मिळणार जीवदान,पावसाची जोरदार हजेरी
Solapur News : समानीकरणात अडकली शिक्षकांची ४५० पदे; पटसंख्येच्या तुलनेत पुरेशा शिक्षकांची मागणी

तालुक्यात 8 जुलै अखेर पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) -

पिकाचे नाव - सरासरी क्षेत्र - पेरणी क्षेत्र - टक्केवारी

बाजरी - 15596 - 9776 - 62.68

मका - 3901 - 17,347 - 444.61

तुर - 2572.20 - 1215.40 - 47.25

उडीद - 94.00 - 587.80 - 625.32

मुग - 85.60 - 209.50 - 244.75

भुईमूग - 154.80 - 300.70 - 194.25

सूर्यफूल - 283.80 - 1073.69 - 378.29

एकूण - 22,719.20 - 30696.90 - 135.11

आनंदाची बातमी : 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाला मिळणार जीवदान,पावसाची जोरदार हजेरी
Solapur: लोकसभेतील पराभवाचं चिंतन करण्यासाठी बोलावलेल्या भाजपच्या बैठकीत राडा; धनंजय महाडिकांसमोरच गोंधळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.