milk producer farmer
milk producer farmer

दूध उत्पादकांसाठी गूड न्यूज... 128 कोटीच्या अनुदानास मंजुरी 

Published on

सोलापूर : दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना तत्कालीन युती सरकारने फेब्रुवारी ते मार्च 2019 दरम्यान प्रतिलीटर तीन रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यानुसार राज्यातील 42 खासगी व सहकारी दूध प्रकल्पांनी 128 कोटी 67 लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव दुग्ध व्यवसाय विकास विभागाला सादर केला. मात्र, मागील वर्षभरात दूध उत्पादकांना न मिळालेल्या अनुदान वितरणास शासनाने मंजुरी दिली आहे. 

राज्यातील दुष्काळ, महापूर, अवकाळी, गारपीट यासह अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील पशुधन 30 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. बहूतांश जनावरे आजारी पडले असून चाऱ्यांचे दरही वाढू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेतीला पुरक व्यवसाय म्हणून ओळख असलेला दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे शासनाकडून वर्षांनंतरही दूध अनुदानाची रक्‍कम मिळत नसल्याने बळीराजाची चिंता आणखी वाढली आहे. सोलापुरातील शिवप्रसाद दूध संघाचे सव्वाकोटी रुपयांचे अनुदान थकले आहेत. तर राज्यातील अन्य खासगी व सहकारी 41 प्रकल्पांमध्ये दूध घातलेल्या तीन लाख 86 लाख शेतकऱ्यांचे 127 कोटींचे अनुदान मिळालेले नाही. विशेषत: यातील बहूतांश दूध प्रकल्प सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, साताऱ्यातील आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशन, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अन्‌ निवडणुकांमुळे अनुदानास विलंब लागल्याचे राज्याच्या दूग्ध विकास विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आता शासनाकडून मंजुरी मिळाल्याने अनुदानाचे वितरण फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असे दूग्ध विकास विभागाने स्पष्ट केले. 


राज्याची स्थिती 
थकीत दूध अनुदान 
128.67 कोटी 
अनुदानाच्या प्रतीक्षेतील दूध प्रकल्प 
42 
दूध उत्पादक शेतकरी 
3.86 लाख 


फेब्रुवारीपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान 
फेब्रुवारी ते मार्च 2019 दरम्यान प्रतीलिटर तीन रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार राज्यातील 42 खासगी व सहकारी दूध प्रकल्पांच्या 128 कोटी 67 लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव शासनाला पाठविला. अनुदानाची रक्‍कम मंजूर झाली असून अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यात वितरीत करण्यात येईल. 
- शिवाजी शेळके, सहायक दूग्ध विकास अधिकारी, दूग्ध विभाग, पुणे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.