मंगळवेढा : पंढरपूर शहरात झालेल्या भूखंड घोटाळ्याचा प्रश्न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आ. समाधान अवताडे यांनी उपस्थित करून चक्क 26 जानेवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी खरेदी झाल्याचा प्रश्न उपस्थित करून शासकीय शासकीय कार्यालयातील गैरप्रकारची लक्तरे विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न केला.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी विविध प्रश्नांवरील पुरवणी मागण्यावर चर्चा करत असताना त्यांनी पंढरपूर व मंगळवेढ्यातील अनेक प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये पंढरपूर शहरात झाली मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिटी सर्वे क्रमांक ४०७५/१/अ/ १/ ९६६.५६ चौरस मीटर या कोट्यावधी रुपयाच्या भूखंडाची नगरपालिकेच्या अधिकारी व नोंदणी अधिकारी यांच्याशी संगणमत करून लाटला.
विशेष म्हणजे सदरचा भूखंडाचा दस्तावेज 26 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असताना ही कार्यालये खुली कशी असा आरोप करत नगरपालिका व बांधकाम अधिकारी या प्रकरणात ज्यांनी गैरप्रकार केला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली.
त्याचबरोबर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अद्यावत क्रीडा संकूलन उभारण्याची मागणी केली,शेती व शेतीच्या वहिवाटी संदर्भात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत त्यामध्ये रस्त्यावरून अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. महसूल प्रशासनाकडे प्रलंबित असलेले रस्त्याचे खटले जलद गतीने निकाली काढण्यात यावे अशी मागणी केली.
पंढरपुरातील मेहतर समाजातील कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून द्यावी, पद्मावती व जिजाऊ उद्यान शुशोभीकरण करण्याची मागणी ही यावेळी बोलताना केली की एकूणच आ.अवताडे यांनी पंढरपुरातील भूखंड घोटाळ्याचा प्रश्न विधानसभेत मांडताना विधानसभा सभापतीला बेलवरचा हात आखडता ठेवण्याची विनंती देखील यावेळी केली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.