सोलापूर : शासनाने बाळंतपणासाठी दाखवली सरकारी रुग्णालयांची वाट

महात्मा फुले जीवनदायी योजना बंद!
Hospital
Hospitalsakal
Updated on

ब्रह्मपुरी : कोरोनाच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले (Jyotirao Phule)जन आरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयात (Private Hospital)दिली जाणारी मोफत प्रसूती सुविधा नवीन वर्षात बंद करण्यात आली आहे. यापुढे मोफत प्रसूतीसाठी पात्र लाभधारकांना महात्मा फुले आरोग्य योजनेतील रुग्णांना सरकारी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय व प्राथ.आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयातच जावे लागणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave)भीती बाळगणाऱ्या शासनाने गरोदर मातांना पुन्हा सरकारी रुग्णालयांची वाट दाखवली आहे.

Hospital
साथीच्या काळात Immunity वाढविण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा हे बदल

मागील वर्षात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना २० डिसेंबर रोजी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत निर्णय घेतला होता. याकाळात शासकीय रुग्णालयावर कोरोनाच्या रुग्णांचा भार असल्यामुळे खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे. त्या रुग्णालयांना पात्र लाभार्थींना मोफत बाळंतपणाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सुविधेचा चा कालावधी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आला होता.ही मुदत संपली असल्यामुळे एक जानेवारीपासून शासकिय योजना मंजूर असलेल्या रुग्णालयांनी योजने अंतर्गत प्रसूतीची प्रकरणे घेऊ नये. अशी सूचना ३१ डिसेंबर रोजी आरोग्य मित्रा मार्फत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ही योजना सुरू राहणार आहे.

Hospital
सोलापूर : कोरोनात पोटभर अन्नासाठी सर्वसामान्यांचा संघर्ष!

शासन एकीकडे ओमायक्रॉनच्या भीतीपोटी रोज नवनवे निर्बंध घालत आहे. सर्व शासकीय यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत आहे. दुसरीकडे आर्थिक दुर्बल घटकांसाठी खासगी रुग्णालयांत मिळणारी मोफत प्रसूतीची योजना बंद केली जात आहे. भविष्यात खरोखर कोरोना ची तिसरी लाट आली तर शासकीय रुग्णालय पुन्हा एकदा कोरोना पीडितांनी भरण्याची शक्यता आहे. अशातच पुन्हा गरोदर माता व कुटुंबीयांना शासकीय रुग्णालयात जावे लागेल.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात रुग्णांना वेळेत चांगल्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही सार्वजनिक आरोग्य विभागासह विविध यंत्रणांचा उत्कृष्ट समन्वय साधला.‌ परिणामस्वरूप राज्यात गेल्या दोन वर्षांत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेद्वारे कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील लाखों रुग्णांवर मोफत उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात शुभ्र शिधापत्रिकाधारक रुग्णांवरही उपचार करण्यात आले.खासगी रुग्णालयांना मुभा सरकारी रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवांसाठी नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि त्यामध्ये प्रसूती समावेश असल्यामुळे कोरोना काळात सामान्य कुटुंबांना या योजनाचा आधारवड होता.

Hospital
सोलापूर : कोरोनात योग, संगीताकडे दुर्लक्ष

त्यामुळे कोरोना च्या काळात जनतेची खूप मोठ्या प्रमाणात सोय झाल्याने , अशा शासनमान्य दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब लोकांना चांगल्या दर्जाची सेवा विनामूल्य मिळाली . याबाबत गोरगरीब जनता शासनाची खूप खूप आभारी असल्याची भावना सर्वत्र होत आहे .परंतु आता कोरना काळ संपूर्णपणे संपलेला आहे असे समजून योजना बंद केली आहे .वास्तविक पाहता कोरोना अजून संपलेला नाही. ओमायक्रोन चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शाळा-कॉलेजे कार्यालय बंद होत आहे . अशा परिस्थितीत पूर्वीप्रमाणे गोरगरीब लोकांना जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जावे लागणार आहे कारण , प्राथमिक आरोग्य केंद्रे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय या ठिकाणचा सर्व कर्मचारी वृंद व डॉक्टर्स अजूनही कोव्हीड 19 नियंत्रणाचे काम म्हणून 15 ते 18 वयोगटातील तरुण नागरिकांचे लसीकरण, साठ वर्षे वयोगट असलेल्या लोकांचे, इतर आजार असलेले लोकांची लसीकरणे करण्यात व शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात रात्रंदिवस झटत आहेत.त्यामुळे प्रसुतीच्या सेवा देण्यामध्ये कोणत्याही नर्स, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना वेळच उपलब्ध नाही.

Hospital
सर्वसामान्यांचा Corporate FDमध्ये वाढता इंटरेस्ट!

तेव्हा अशा परिस्थितीत उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालये या ठिकाणी दूर दूर जाण्यापेक्षा खाजगी हॉस्पिटलला जाऊन भरमसाठ पैसा देऊन, प्रसूती करून घ्यावी लागत आहे.तेव्हा कोराना काळात अजून काही महिने तरी ही सेवा बंद न करता चालू ठेवायला हवी होती अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहेत .विशेष म्हणजे अनेक खाजगी रुग्णालय ही सेवा इतक्या कमी रुपयात सेवा देत असून गोरगरिबांना सेवा मिळाव्यात या उद्देशाने राज्यातील काही खाजगी हॉस्पिटल नी तयारी दर्शवली तशी सेवा यशस्वीरीत्या अखंडीतपणे चालू ठेवल्या होत्या .एकीकडे अडचणीतील काळात गरोदर मातांना सर्वसाधारण प्रसूती व सिजेरियन शस्त्रक्रिया यासाठी सरकारी जिल्हा रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी प्रसूती साठी जाण्यासाठी वाहनांची सोय नसून त्रासास सामोरे जावे लागत आहे. तसेच गोरगरीब ,शेतकरी ,ऊसतोड मजूर , व सामान्य जनतेला खाजगी दवाखान्यांमध्ये जाऊन आर्थिक भुर्दंड सोसून प्रसूती करून घ्यावी लागणार असून आर्थिक अडचणीत सामोरे जावे लागत आहे. तरी कोरोना काळात शासनाने गरोदर मातांना प्रसूती साठी ही योजना पुर्वरत चालू ठेवून सेवा द्यावी अशी ग्रामीण भागातून सुर उमटत आहे.

Hospital
वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचा निघतोय घाम !

" प्रसूतीसाठी ची योजना बंद झाल्यामुळे गोर गरीबांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून ग्रामीण भागात ही योजना लाभदायी ठरली आहे तरी सेवा पूर्वरत चालू करावी"..

भारत शिंदे, मरवडे

" कोरोना काळात तात्पुरत्या स्वरूपात गरोदर मातांसाठी प्रसुती व सिजेरियन ही योजना खाजगी रुग्णालयात शासनाने समाविष्ट केली होती आता ही योजना 31 डिसेंबर रोजी बंद करण्यात आली आहे.

- दीपक वाघमारे ,जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जीवनदायी योजना

"कोरोना काळात शासकीय कर्मचारी यांना कोव्हिड चे कामकाज जास्त होते त्यामुळे ही योजना खाजगी रुग्णालयात दिली होती. सध्या शासकीय हॉस्पिटल मध्ये बाळंतपण चालू आहे तसेच सदर योजना बंद बाबत धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर झालेला आहे."

- सुधाकर शिंदे , मुख्य कार्यकारी अधिकारी , महत्मा फुले जीवनदायी योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.