Gram Panchayat Election : शहाजीबापू पाटलांना होमपिचवर स्वकीयांकडून आव्हान, विधानसभेची सेमीफायनल' रंगणार

सरपंचपदासाठी तीन महिला तर सदस्यपदांसाठी ३६ जण रिंगणात
gram panchayat election shahaji patil challenge by thackeray group subhash bhosale sangola politics
gram panchayat election shahaji patil challenge by thackeray group subhash bhosale sangola politicsSakal
Updated on

महूद : सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजी पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या ‘होम पीच’वर चिकमहूद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेने गटाच्या सुभाष भोसले या स्वकियाकडूनच आव्हान देण्यात आले आहे. चिकमहूद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमदार पाटील यांच्या पॅनेल विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना व शेकाप यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी तीन महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणणारे आमदार शहाजी पाटील यांचे मूळ गाव असलेल्या चिकमहूद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. चिकमहूद ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार का?

यावर बरीच चर्चा सुरू होती. त्यासाठी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठा प्रयत्नही केला होता. मात्र, आमदार पाटील यांचे स्वकीय असलेले सुभाष भोसले यांनी उद्धव ठाकरे शिवसेना व शेकापच्या युतीचे स्वतंत्र पॅनेल उभारून बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

चिकमहूद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार), भाजप यांनी एकत्र येऊन स्व. सुभाषनाना पाटील ग्रामविकास आघाडी केली आहे. विरोधात उद्धव ठाकरे शिवसेना व शेकापची तामजाई देवी परिवर्तन ग्रामविकास आघाडी अशी लढत आहे.

सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी तब्बल २१ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील १८ जणांनी माघार घेतल्यामुळे पाटील ग्रामविकास आघाडीकडून शोभा सुरेश कदम विरुद्ध परिवर्तन आघाडीच्या सुप्रिया सुभाष भोसले यांच्यासह अपक्ष लक्ष्मी युवराज भोसले या निवडणूक रिंगणात आहेत.

पाच प्रभागांतून १५ सदस्य निवडून द्यावयाच्या आहेत. त्यासाठी तब्बल १०७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, शेवटच्या दिवशी त्यातील ३६ जण रिंगणात राहिले आहेत. पाटील आघाडीकडून नितीन सातपुते, सुनीता हुबाले, रखमा पारसे (प्रभाग एक), राजेंद्र भोसले, सविता जाधव,

सुनीता चव्हाण (प्रभाग दोन), दीक्षा कदम, सोनाली सावंत, दादासाहेब महारनवर (प्रभाग तीन), वंदना फडतरे, तुषार भोसले, संजय पारसे (प्रभाग चार), कुंडलिक जाधव, लक्ष्मी भोसले, वामन यादव (प्रभाग पाच) यांच्या विरोधात परिवर्तन आघाडीकडून शंकर बंडगर, विश्रांती पाटील, वर्षा तांबवे (प्रभाग एक), भारत भोसले, शोभा भोसले, पूनम मंडले (प्रभाग दोन), शोभा धांडोरे,

धनश्री भोसले, विजय वाघमोडे (प्रभाग तीन), कुसुम भोसले, सुभाष भोसले, मारुती पारसे (प्रभाग चार), समाधान जाधव, किसन यादव, अर्चना सरगर(प्रभाग पाच) यांच्यामध्ये लढत होत आहे. प्रभाग दोनमधून अनिल कदम, शरद कदम, भीमराव ढेंबरे तर प्रभाग तीनमधून संगीता कदम, प्रभाग चारमधून युवराज भोसले हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

पाटील आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार शोभा कदम यांच्या उमेदवारीवरून विरोधकांसह स्वकियांनीही आमदार शहाजी पाटील यांना घेरण्याचा कमालीचा प्रयत्न केला होता. सुरवातीला या सर्वांनीच या उमेदवारीला थेट विरोध करत ही उमेदवारी बिनविरोध निवडणुकीसाठी अडचण ठरत असल्याचे सांगितले होते.

शोभा कदम यांच्या उमेदवारीला असलेला विरोध दूर करण्यास पाटील आघाडीच्या नेतृत्वाला यश आले. शोभा कदम यांचे पती सुरेश कदम हे आमदार शहाजी पाटील यांचे मेहुणे असून गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून ते गावातील राजकारणामध्ये सक्रिय आहेत. दुसऱ्या बाजूला विरोधी पॅनेलचे सुभाष भोसले हे नवखे आहेत. तर येथील शेकापची ताकद प्रभाग एकपुरती मर्यादित आहे, असे सांगितले जाते.

दोन्ही पॅनेलकडून विजयाचा दावा

प्रभाग एकमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कामे केली आहेत, त्याचा फायदा आम्हालाच होणार, असे पाटील आघाडीकडून सांगण्यात येते. गावच्या विकासासाठी तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही प्रस्थापिथांच्या विरोधात पॅनेल उभा केला आहे, असे उद्धव ठाकरे शिवसेनेचे सुभाष भोसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.