पेरूची पाने व‌ डाळिंबाची साल वरदान! मधुमेह, कर्करोग, हृदयविकार, तोंडाचा अल्सर होईल बरा

पेरूची पाने आणि डाळिंबाच्या सालीमुळे शरीरातील अनेक व्याधी दूर होऊ शकतात. पेरूबरोबरच पेरूच्या पानांचा देखील शरीराला मोठा फायदा होतो. शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यापासून डायबेटीजपर्यंत अनेक समस्या दूर होऊ शकतात.
डाळिंब
डाळिंबesakal
Updated on

सोलापूर : पेरूची पाने आणि डाळिंबाच्या सालीमुळे शरीरातील अनेक व्याधी दूर होऊ शकतात. पेरूबरोबरच पेरूच्या पानांचा देखील शरीराला मोठा फायदा होतो. शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यापासून डायबेटीजपर्यंत अनेक समस्या दूर होऊ शकतात. सकाळी रिकाम्यापोटी पाण्यात पेरूची पाने उकळून ते पाणी पिल्याने आरोग्य सुदृढ राहते. त्यात प्रथिने, व्हिटॅमिन- सी, गॅलिक ॲसिड, फिनोलिक संयुगे, अँटिऑक्सिडेंट, दाहकविरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तर डाळिंबाची साल तोंड व जिभेवरील अल्सर घालवतात. वजन कमी करण्यासाठी, शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरते.

रक्तातील साखर व वजन नियंत्रणात ठेवते

पेरूच्या पानांची चव तुरट असते. पेरूची पाने रक्तातील साखर कमी करण्यास आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्यास मदत करतात. तसेच पेरूच्या पानांचे पाणी पचन सुधारण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरात साठवलेली अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात.

हिमोग्लोबिन वाढवतात व तोंडाचा अल्सर बरा होतो

अशक्तपणात पेरूची पाने रक्तातील ऑक्सिजन वाढवतात. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्‌स वाढविण्यासही मोठी मदत करतात. लाल पेशी वाढविण्यासाठी देखील पेरूची पाने फायद्याची आहेत. तसेच शरीरातील उष्णतेमुळे तोंडावर आणि जिभेवर फोड आले असल्यास पेरूची पाने पाण्यात उकळून प्यायल्यास आराम मिळतो.

डाळिंबाची साल आरोग्य अन्‌ सौंदर्यासाठी उपयुक्त

डाळिंबाच्या सालीत उच्च पातळीचे अँटीऑक्सिडंट असल्याने त्यातून अनेक फायदे होतात. डाळिंबाच्या सालीत अँटीऑक्सिडंट आणि पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा वापर हायपरपिग्मेंटेशन (त्वचेवरील काळे डाग) दूर करण्यासाठी होऊ शकतो. डाळिंबाच्या साली ‘अल्ट्राव्हायलेट बी’च्या नुकसानीपासून संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात.

हृदयविकार व‌ मधुमेहावर उपयुक्त

डाळिंबाच्या सालींमुळे हृदयविकार व मधुमेहासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो. डाळिंबाच्या सालीचा अर्क दाहकविरोधी एजंट म्हणूनही काम करतो. जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ लोकांमधील कोलेस्टेरॉल व रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते. तसेच जसजसे वय वाढते तसा बहिरेपणा येतो. त्यावेळी ऑक्सिटेटिव्ह तणाव हा एक योगदान देणारा घटक असतो. डाळिंबाच्या सालीत अँटीऑक्सिडंट जास्त असल्याने ते बहिरेपणा टाळण्यास मदत करतात.

मेंदूचे कार्य सुधारते, कर्करोगाविरुद्ध लढण्यास मदत

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे अल्झायमर वाढतो. डाळिंबाच्या सालीत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्याने, ते या स्थितीत लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत करू शकतात. तसेच त्या सालीत प्युनिकलगिनचे प्रमाण जास्त असते. हे पॉलिफेनॉल आहे, ज्यात अँटीकार्सिनोजेनिक गुणधर्म आहेत. डाळिंबाने स्तन, तोंड, आतड्याच्या कर्करोगाच्या पेशींवर प्रजननविरोधी प्रभाव दर्शविला आहे. याचा अर्थ ते कर्करोगाच्या पेशींचा प्रसार कमी करण्यास किंवा थांबविण्यास मदत करते. याशिवाय डाळिंबाची साल यकृताच्या कर्करोगावर देखील प्रभावी आहे. त्यात यकृताला संरक्षण देणारे गुणधर्म आढळतात.

डाळिंबाची साल कशी वापरायची?

डाळिंबाच्या सालीची पावडर बाजारात उपलब्ध आहे किंवा घरातही बनवता येते. त्यासाठी साली थेट सूर्यप्रकाशात दोन-तीन दिवस किंवा पूर्णपणे कोरडे होईपर्यंत ठेवा. साली ब्लेंडर किंवा फ्रूट प्रोसेसरमध्ये ठेवा आणि बारीक करा. पावडर खोलीच्या तापमानावर हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा.

शुभंकरोती कल्याणम्‌ ! आरोग्यम्‌ धनसंपदा...

निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते. संत साहित्यात व आयुर्वेदात आरोग्याला ‘धनसंपदा’ म्हटले आहे. निरोगी माणूस आपला शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास करू शकतो. रोगी माणसाला सुख, समाधान मिळत नाही. त्याचे अख्खे आयुष्य व कमावलेले धन आजारपणातच जाते. त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन खूप महत्त्वाचे आहे. जीवन सुखी, समाधानी असण्याची गुरुकिल्ली म्हणजेच ‘उत्तम आरोग्य’ होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.