अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात आज साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
अक्कलकोट (सोलापूर) : श्री गुरुदेव दत्तात्रेयाचे चौथे अवतार म्हणून ओळखले जाणारे अक्कलकोटचे (Akkalkot) स्वामी समर्थ महाराज (Swami Samarth Maharaj) यांच्या वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात आज साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांमध्ये गुरुपौर्णिमा (Gurupournima) साजरी करण्यात आली. वटवृक्ष मंदिरात एकाही स्वामीभक्ताला प्रवेश देण्यात आला नाही. याप्रसंगी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्री गुरू स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे. कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेमुळे यंदा 25 मार्च रोजी स्वामींचे वटवृक्ष मंदिर पुन्हा बंद करण्यात आले, ते आजमितीपर्यंत बंदच आहे. मंदिरातील स्वामींचे नित्योपचार, नित्यक्रम, पूजाअर्चा, धार्मिक विधी हे नियमितपणे चालू आहेत. या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) वटवृक्ष स्वामी मंदिरातील श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने कोणत्याही भाविकांविना साजरा करण्यात आला. (Gurupournima was celebrated at Vatvriksha Swami Mandir in Akkalkot without devotees-ssd73)
गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे पाच वाजता स्वामींची काकड आरती पुरोहित मोहन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात व सकाळी 11 वाजता गुरुपौर्णिमेची महानैवेद्य आरती मंदार पुजारी यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात आले. कोणत्याही भाविकांचा या पूजेत सहभाग नव्हता. आरतीनंतर मंदिर बंद करून गाभारा मंडपाचे प्रवेशद्वार त्वरित बंद करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे म्हणाले, अनंतकोटी ब्रह्मांडनायक वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या प्रति अनेक स्वामी भक्तांच्या मनात असलेल्या गुरुस्थानामुळे आपल्या या वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमेस दरवर्षी अनेक स्वामीभक्त स्वामींच्या भेटीकरिता येत असतात. परंतु यंदाही गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तास कोरोना लॉकडाउनमुळे विघ्न लागल्याने स्वामींनाच गुरू मानणाऱ्या भाविक शिष्यांना यंदाही स्वामी दर्शनास मुकावे लागले आहे. या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे यंदा गुरुशिष्यांच्या भेटीची परंपरा इतिहासात दुसऱ्यांदा खंडित झाली आहे. संकटातून स्वामींनी संपूर्ण जगास लवकरात लवकर मुक्त करावे, याकरिता श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचे सांगून, स्वामी भक्तांनी देखील गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही घरीच थांबून स्वामींची आराधना करावी, असे आवाहनही इंगळे यांनी याप्रसंगी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.